मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके
Marathi Writer and Books-मराठी लेखक त्यांची ग्रंथ संपदा
- मराठी संत आणि त्यांची ग्रंथ संपदा
- समाजसेवक आणि त्यांची ग्रंथ संपदा
- प्रसिद्ध नाटककार आणि त्यांची ग्रंथ संपदा
- मराठी कवी आणि त्यांची ग्रंथ संपदा
- मराठी कादंबरीकार आणि त्यांची ग्रंथ संपदा
मराठी भाषेत-Marathi Writer and Books अतिशय दर्जेदार लेखक,कवि,कादंबरीकार,इतिहासकार झालेले आहेत.अनेक लेखक आणि ग्रंथ संपदा सुप्रशिदध आहे.
Sant And Books (Marathi Writer and Books)-मराठी संत त्यांची ग्रंथ संपदा
मुकुंदराज | हे मराठीतील आद्य कवी आहेत.विविकसिंधू,मूलस्तंभ,परागगृत, पवनविजयी आदी प्राचीन ग्रंथ. |
संत ज्ञानेश्वर | संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म पैठण जवळील आपेगांव येथे झाला.भावार्थदीपिका (म्हणजेच ज्ञानेश्वरी) अमृतानुभव,चांगदेव पासष्टी, हरिपाठ |
संत नामदेव | त्यांच्या काही गाथा शीख धर्माच्या पवित्र ग्रंथसाहिब या महान ग्रंथात समाविष्ट आहेत.नामदेव गाथा हा त्यांचा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. |
संत एकनाथ | एकनाथांचा जन्म औरंगाबाद जवळील पैठण शहरात झाला. एकनाथी भागवत,भावार्थरामायण चतु: श्लोकी भागवत,रुक्मिणी स्वयंवर हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. |
समर्थ रामदास | रामदास स्वामींचा जन्म अंबड जवळील जांब या ठिकाणी झाला.दासबोध,मनाचे श्लोक,करुणाष्टके,चौदा शतक हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत |
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विदर्भातील प्रसिद्ध आधुनिक संत होते.त्यांनी ग्रामगीता नावाचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. |
Marathi Socail Workers Writer and Books-समाजसेवक आणि ग्रंथ संपदा
महात्मा ज्योतिबा फुले | महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेवक,सार्वजनिक सत्य धर्म,गुलामगिरी,ब्राह्मणांचे कसब,इशारा,शिवाजी राजांचा पोवाडा,तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा आसूड,अस्पृश्यांची कैफियत |
बाळ गंगाधर टिळक | बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य टिळक या नावाने सुद्धा ओळखले जाते.गीतारहस्य ओरायन दी आर्तिक्त होम इन वेदाज. गीतारहस्य हा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला आहे. |
बाबा आमटे | बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण केले. ज्वाला आणि फुले,उज्ज्वल उद्यासाठी,माती जागवील त्याला मत |
बाबा आढाव | बाबा पांडुरंग आढाव महाराष्ट्रातील असंघटित कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात.एक गाव एक पाणवठा, हे तर शेटजी भटजीचे आधुनिक दासच, सत्यशोधनाची वाटच |
साने गुरुजी | श्यामची आई,हा पत्र संग्रह आणि पत्री हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. |
नामदेव लक्ष्मण ढसाळ | मराठी भाषेतील विद्रोही कवी काव्यसंग्रह-गोलपिठा,मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले,आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र, प्रियदर्शनी, तुही यत्ता कंची, खेळ,गांडू बगीच्या,या सत्तेत जीव रमत नाही, गुलाबी आयाळ सोडा,तुझे बोट धरून चाललो आहे मी, कादंबरी-हडको हाडवळा, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे. |
यशवंतराव चव्हाण | महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, प्रसिद्ध लेखक शिवनेरीचे सोबती,सह्याद्रिचे वारे, युगांतर,ऋणानुबंध, कृष्णाकाठ,कृष्णाकाठ हे आत्मचरित्र |
लक्ष्मण माने | उपरा,बंद दरवाजा |
अण्णाभाऊ साठे | तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे मराठी भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार आणि नाटककार फकीराअमृत,आघात,आबी, इनामदार,कापऱ्या चोर,कृष्णाकाठच्या कथा, खुळवाडा,गजाआड,गुलाम, चित्रा, चिखलातील कमळ,गुऱ्हाळ,चंदन, चिरानगरची भुतं,नवती,निखारा,जिवंत काडतूस,तारा,देशभक्त निखारे,फरारी,मथुरा,माकडीचा माळ,रत्ना,रूपा,बरबाद्या कंजारी, बेकायदेशीर,माझी मुंबई,मूक मिरवणूक, रानबोका, वैजयंता,वारणेचा वाघ,लोक मंत्र्याचा दौरा,वैर,शेटजींचे इलेक्शन |
प्रशिदध नाटककार आणि ग्रंथ-Marathi Writer and Books
राम गणेश गडकरी | महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाटककार.नाटके-एकच प्याला,भावबंधन, पुण्यप्रभाव,प्रेमसंन्यास, राजसंन्यास, संपूर्ण बाळकराम,हा विनोदी लेख संग्रह आणि “वागवैजयंती” हा काव्यसंग्रह |
आचार्य प्र. के. अत्रे | प्रल्हाद केशव अत्रे मराठी भाषेतील प्रसिद्ध नाटककार व कथा लेखक नाटके-घराबाहेर,उद्याचा संसार, मोरूची मावशी, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे, प्रेमाचा भोपळा, गुरू-दक्षिणा,लग्नाची बेडी, बुवा तेथे बाबा,मी मंत्री झालो, तो मी नव्हेच, काव्यसंग्रह-झेंडूची फुले, गीत गंगा आत्मचरित्रपर ग्रंथ-कर्हेचे पाणी,मी कसा झालो. कथासंग्रह-साखरपुडा,वामकुक्षी, ब्रँडीची बाटली, वेड्यांचा बाजार, इतर ग्रंथ-केल्याने देशाटन, मराठी माणसे, मराठी मने, दूर्वा आणि फुले, साहित्य यात्रा, हास्य कथा,हशा आणि टाळ्या, मुद्दे आणि गुद्दे |
व्यंकटेश माडगूळकर | मराठीतील प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार.नाटके-वेडा कुंभार, पती गेले ग काठेवाडी. -बनगरवाडी,सत्तांतर, करुणाष्टक,चित्रकथी वावटळ, कोवळे दिवस. कथा-माणदेशी माणसे, गावाकडल्या गोष्टी, हस्ताचा पाऊस,काळी आई. |
पु.ल.देशपांडे | पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखक आणि कथाकार,नाटककार नाटके-बटाट्याची चाळ, असा मी असामी,अपूर्वाई, पूर्वरंग,व्यक्ती आणि वल्ली, गणगोत,व्यंगचित्रे, अंमलदार, तुज आहे तुजपाशी,सुंदर मी होणार,ती फुलराणी, तीन पैशाचा तमाशा,वटवट सावित्री, छोटे मासे मोठे मासे, विठ्ठल तो आला आला. इतर पुस्तके-एक आठवण,खोगीरभरती,विशाल जीवन. |
वसंत शंकर कानेटकर | मराठी भाषेतील प्रसिद्ध आणि कथा लेखक नाटके-अश्रूंची झाली फुले, वेड्याचं घर उन्हात, प्रेमा तुझा रंग कसा,इथे ओशाळला मृत्यू, मला काही सांगायचंय, रायगडाला जेव्हा जाग येते, विषवृक्षाची छाया |
विजय तेंडुलकर | मराठी भाषेतील प्रसिद्ध नाटककार नाटके-शांतता कोर्ट चालू आहे, अशी पाखरे येती,सखाराम बाईंडर,कमला |
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर | मराठी भाषेतील प्रसिद्ध नाटककार आणि कथाकार नाटके-सुदाम्याचे पोहे,अठरा धान्याचे कडबोळे. कादंबऱ्या-मती विकार, वीर तनय, गुप्त मंजुषा,प्रेम शोधन, वधू परीक्षा, चिमणराव गुंड्याभाऊ, मूकनायक, सहचारिणी, |
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर | प्रसिद्ध मराठी भाषेतील प्रसिद्ध नाटककार व पत्रकार नाटके-मानापमान,सत्वपरीक्षा, स्वयंवरकीचक वध, सवाई माधवरावांचा मृत्यू, भाऊबंदकी. |
कवि आणि कविता संग्रह
कुसुमाग्रज | कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर मराठी भाषेतील प्रतिभावंत कवी, कथाकार,नाटककार, कादंबरीकार, लघुनिबंधकार, समीक्षक होते. त्यांच्या “विशाखा” या कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. काव्यसंग्रह-जीवन लहरी,जाईचा कुंज, विशाखा, समिधा, किनारा,मेघदूत, मराठीमाती,स्वागत, हिमरेषा, वादळवेल, छंदोमई. नाटके-वैजयंती, कौंतेय,नटसम्राट, ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला,दूरचे दिवे, कादंबऱ्या-वैष्णव,जान्हवी, कल्पनेच्या तीरावर. |
ग.दि.माडगूळकर | गजानन दिगंबर माडगूळकर मराठीतील विख्यात कवी पटकथा-संवाद लेखक होते.चैत्रबन,जोगिया, गीतारामायण,मंतरलेले दिवस |
शांता शेळके | काव्यसंग्रह-कळ्यांचे दिवस व फुलांच्या राती,गोंदन, जन्म जान्हवी,तोच चंद्रमा,पूर्वसंध्या. कथासंग्रह-अनुबंध,वाच कमळ,कावेरी,गुलमोहर, मुक्ता. कादंबऱ्या-ओढ,चिखलदऱ्याचा मांत्रिक,नरराक्षस,पुनर्जन्म, सप्तरंग. चित्रसंग्रह-वडीलधारी माणसे. लेखसंग्रह-आनंदाचे झाड,मदरंगी, पावसाआधीचा पाऊस. |
फ.मु.शिंदे | फकीरराव मुंजाजी शिंदे मराठीतील प्रसिद्ध कवी आणि लेखक. काव्यसंग्रह-अवशेष, निरंतर, जुलूम,आदिम,वृंदगान, फकिराचे अभंग,प्रार्थना,आई. |
आरती प्रभू | आरती प्रभू यांचे पूर्ण नाव चिंतामणी त्र्यंबक खानोलकर होते.काव्यसंग्रह-जोगवा, दिवेलागण,नक्षत्रांचे देणे, गोपाळ गाणी( बालगीते).नाटके-अजब न्याय वर्तुळाचा, एक शून्य बाजीराव, अवध्य, कालाय तस्मे नमः, सगेसोयरे,श्रीमंत पतीची राणी, अभोगी, हयवदन,रखेली. कादंबऱ्या-रात्र काळी घागर काळी,अजगर,कोंडुरा, त्रिशंकू, गनुराय आणि चिनी, राखी,पाखरू,बाप. |
विं.दा.करंदीकर | पूर्ण नाव-गोविंद विनायक करंदीकर काव्यसंग्रह-स्वेदगंगा, मृदगंध, धृपद,सार्थक, सहिता, अष्टदर्शन. |
प्रसिद्ध कादंबरीकार आणि ग्रंथ संपदा
लेखक | ग्रंथ संपदा |
गोपाळ हरी देशमुख | लक्ष्मी शान,ग्रामरचना,हिंदुस्थानचा इतिहास,पूर्वार्ध,शतपत्रे,आगम प्रकाश ही त्यांची ग्रंथसंपदा |
दादोबा पांडुरंग | दादोबा पांडुरंग यांनी मराठी भाषेचे व्याकरण,विधवाश्रम,आर्जन, शिशू बोध, यशोदा,पांडुरंगी, धर्म विवेचन, पारमहंसिक ब्राम्हधर्म |
अनुताई वाघ | अनुताई वाघ यांनी प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात प्रचंड मोठे कार्य त्यांनी कुरण शाळा,सहज शिक्षण,कोसबाडच्या टेकडीवरून ही ग्रंथ संपदा लिहिली. |
ह.ना.आपटे | मधली स्थिती,भयंकर दिव्य,मायेचा बाजार,कर्मयोग,जग हे असे आहे,उष:काल,गड आला पण सिंह गेला,सूर्योदय,सूर्यग्रहण,स्फुट गोष्टी,सती पिंगला, संत सखुबा ही ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे. |
चिं.वी.जोशी | एरंडाचे गुऱ्हाळ,वायफळाचा मळा,चिमणरावाचे च-हाट, हास्य चिन्तामणि,लंका वैभव, बोरी बाभळी |
ना. सी.फडके | कादंबऱ्या-अल्लाहो अकबर, दौलत, प्रवासी, निरंजन, कुलाब्याची दांडी,जादूगार यातसेच गुजगोष्टी, नव्या गुजगोष्टी,धूम्रवर्ण लघुनिबंध संग्रह आणि “तंत्र आणि मंत्र” हा टीकाग्रंथ |
वि. स. खांडेकर | मराठी भाषेतील उत्कृष्ट लेखनाबद्दल त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. कादंबऱ्या-हिरवा चाफा,कांचनमृग, रिकामा देव्हारा,अश्रू,उल्का, पहिले प्रेम,हृदयाची हाक,अमृतवेल,ययाती, कालची स्वप्ने, ऊन पाऊस, नवा प्रातःकाल,जीवन कला,कथासंग्रह-रंकाचे राज्य |
दुर्गा भागवत | भावमुद्रा,डूब,पूर्वा,रुपरंग, प्रासंगिक,व्यासपर्व,गोधडी, रान झरा,धर्म व लोकसाहित्य,ऋतुचक्र, पैज |
आनंद रतन यादव | मराठी भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार. त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार कादंबऱ्या-झोंबी,नागरणी, काचवेल, गोतावळा,नटला, एकलकोंडा, माऊली. कथा-माळावरची मैना, भूमिकन्या, घर जावई,गवळणी,आदिनाल, खळाळ, उघडलेली झाडे, झाड वाटा, |
रणजित देसाई | हे प्रसिद्ध ,नाटक, कादंबरी, ललित कथाकार होते. कादंबऱ्या- स्वामी, श्रीमान योगी, माझ गाव. नाटके– रामशास्त्री, गरुड झेप, हे बंध रेशमाचे. कथासंग्रह– रूप महाल, मोरपंखी सावल्या, |
अनिल अवचट | प्रसिद्ध साहित्यकार आणि सामाजिक छंदाविषयी, सापेक्ष,धागे आडवे उभे,पूर्णिया,वेद,छेद,संभ्रम, मोर, गर्द,प्रश्न आणि प्रश्न, जगण्यातले काही, सृष्टीत गोष्टीत. |
भालचंद्र वनाजी नेमाडे | कोसला या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. कादंबऱ्या-कोसला, हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ, बिढार,हुल, झुल. काव्य संग्रह-मेलडी, देखणी. |
वाचा – महाराष्ट्रातील प्रशिदध व्यक्ति आणि त्याची टोपणनावे येथे क्लिक करा .