Current Affairs Date-07 September 2022
Booker Prise shortlist announced Current Affairs-बुकर पुरस्कारासाठीची लघु यादी जाहीर
जागतिक क्षेत्रातील साहित्य साठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा बुकर पुरस्कार 2022 च्या नामांकनाची लघु यादी जाहीर झाली आहे. Current Affairs Booker Prise
ब्रिटन आणि आयर्लंड या देशांमध्ये प्रकाशित झालेल्या इंग्रजी साहित्यातील सर्वोत्तम कादंबरीला या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
हा पुरस्कार 2005 या सालापासून देण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी सहा नामांकित लेखकांच्या कादंबऱ्यांना नामांकन मिळाले आहे.
श्रीलंकेचे लेखक सेहान करूणतीलका यांची द सेवन मुन्स ऑफ माली अल्मेडा, ब्रिटिश लेखक एलन गार्नर यांची ट्रिकल वॉकर, अमेरिकेच्या एलिझाबेथ स्ट्राऊट यांची ओह विल्यम, झिंबाब्वे देशातील नोव्हायोलेट बुलावायो यांची ग्लोरी ही कादंबरी,अमेरिकी लेखक पर्सिवल एवरेस्ट यांची द ट्रीज आणि आयरिश लेखक क्लेअर किगण यांची स्मॉल थिंग्स लाईक धिस या सहा कादंबऱ्या या पुरस्कारासाठी नामांकित झाल्या आहेत.
या पुरस्काराची घोषणा 17 ऑक्टोबर 2022 रोजी केली जाणार आहे. पन्नास हजार पौंड म्हणजेच जवळपास 45 लाख 65 हजार रुपये रोख बक्षीस या पुरस्कारासाठी निर्धारित आहे.मागील काळात भारतातील सलमान रशदि,अरुंधती रॉय,किरण देसाई,अरविन्द अडिग, या लेखकांनी हा पुरस्कार प्राप्त केला आहे.