Sainik school ऑनलाइन प्रवेश परीक्षा-2023
AISSEE-2023 SSS प्रवेश परीक्षा
सैनिक स्कूल सोसायटी (SSS) ही संरक्षण मंत्रालया अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. Sainik school AISSEE-2023 ही संस्था सैनिकी शाळेचे व्यवस्थापन करते. या सर्व सैनिकी शाळा सीबीएससी या शैक्षणिक बोर्डाची सलग्न आहेत.देशभरातील 33 आणि नव्यानेच मान्यता प्राप्त मिळाली मिळालेल्या 18 सैनिकी स्कूल मधील इयत्ता सहावी आणि इयत्ता नववी मधील प्रवेशासाठी सुवर्णसंधी.शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षासाठी सहावी आणि नववी या वर्षासाठी सैनिकी स्कूलमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या.भारत भरातील विविध सैनिकी शाळेमधील विद्यार्थी 25% विद्यार्थी हे नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) आणि भारतातील विविध सैनिकी अकॅडमी मधील ऑफिसर्स म्हणून भरती होण्याकरिता निवडले जातात.संपूर्ण देशभरातील सैनिकी शाळेमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश हे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश परीक्षा घेऊन केले जातात.शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षाच्या प्रवेशासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल्स एंट्रन्स एक्झामिनेशन (AISSEE) 2023 दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी घेतली जाणार आहे.
विविध राज्यातील सैनिकी शाळा व प्रवेश क्षमता Sainik school AISSEE-2023
राज्य | शाळेचे नाव | 6 वी साठी उपलब्ध प्रवेश क्षमता | 9 वी साठी उपलब्ध प्रवेश क्षमता |
महाराष्ट्र | 1. सैनिक स्कूल सातारा . | 90-boys,10-girls | 12 |
2. पद्मश्री. डॉ. वि . वि . पाटील सैनिक स्कूल, लोणी खुर्द, अहमदनगर (नविन शाळा) | 60 | – | |
3. एस. के. इंटर नॅशनल स्कूल,सांगली.(नविन शाळा) | 120 | – | |
कर्नाटक | सैनिक स्कूल बीजापुर | 90-boys,10-girls | – |
सैनिक स्कूल कोंडागू | 80-boys,10-girls | – | |
सांगोला रायन्ना सैनिक स्कूल सांगोला, बेलगावी (नविन शाळा) | 80 | – | |
विवेक स्कूल ऑफ एक्सलन्स मैसूर (नविन शाळा) | 50 | – | |
गुजरात | सैनिक स्कूल बालचाडी | 67 -boys,10-girls | – |
ब्रम्हानंद विद्या मंदीर जुनागड | 50 | – | |
मोतीलाल चौधरी सागर सैनिक स्कूल मेहसाना (नविन शाळा) | 50 | – | |
आंध्र प्रदेश | सैनिक स्कूल कोरूकोंडा | 68 -boys,10-girls | 22 |
सैनिक शाळा कालीकिरी | 60 -boys,10-girls | 30 | |
अडाणी वर्ल्ड स्कूल नेल्लोरे (नविन शाळा) | 50 | – | |
मध्य प्रदेश | सैनिक स्कूल रेवा | 40 -boys,10-girls | – |
सरस्वती विद्या मंदिर मांदसौर (नविन शाळा) | 100 | – |
इयत्ता सहावी प्रवेशासाठी पात्रता
दिनांक 31 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे वय दहा ते बारा या वर्षा दरम्यान असावे.विद्यार्थ्यांचा जन्म दिनांक एक एप्रिल 2011 ते 31 मार्च 2013 या तारखे दरम्यानचा असावा.
महत्त्वाची सूचना.
भारतभरातील सर्व सैनिक स्कूलमध्ये इयत्ता सहावीतील प्रवेश मुलींसाठी खुले आहेत.
इयत्ता नववीतील प्रवेशासाठी पात्रता.
दिनांक 31 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे वय 13 ते 15 वर्षे यादरम्यान असावे.विद्यार्थ्याचा जन्म एक एप्रिल 2008 ते 31 मार्च 2010 या दरम्यानचा असावा.
महत्वाची सूचना.
इयत्ता नववी वर्गासाठीचे प्रवेश मुलींसाठी खुले नाहीत.
जातवार जागांचे आरक्षण
1. एकूण जागेच्या 67% जागा होम स्टेट करिता राखीव आहेत. 2. 33 % जागा इतर राज्यातील उमेदवारातून भरल्या जातील. 3. होम स्टेट मधील SC वर्गासाठी 15% जागा, ST वर्गासाठी 7.5% जागा, OBC वर्गासाठी 27% जागा राखीव आहेत. 4. शिल्लक जागेमधून 25% जागा या संरक्षण क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी राखीव आहे.
निवड पद्धती.
दोन्हीही वर्गाच्या प्रवेशासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्न असणारी परीक्षा घेतली जाईल.परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
परीक्षा शुल्क
एससी एसटी उमेदवारांसाठी रुपये 500/- इतर उमेदवारांसाठी रुपये 650/-
सैनिकी शाळेचे शैक्षणिक शुल्क.
आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर दरवर्षी शैक्षणिक शुल्क म्हणून अंदाजे 120000/- ते 130000/- या दरम्यानचे शैक्षणिक शुल्क भरावे लागेल.
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.
https://aissee.nta.nic.in/information-bulletin/
प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या संकेतस्थळावर आजच अर्ज करा.
ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022.