महाराष्ट्रातील पिके,जमिन
महाराष्ट्रातील पिके- Maharashtratil Pramukh Pike ही सर्वस्वी निसर्गावर अवलंबून आहेत.विषम प्रकारची जमीन,विषम प्रकारचे हवामान,कायम हुलकावणी देणारा पाऊस या अतिशय भिन्न आणि प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी आपली शेती करत आहे.भूभाग,हवामान,पाऊस,पीक पद्धती याविषयी विस्तृत माहिती या भागात देण्यात आली आहे.
Maharashtratil Pramukh Pike-महाराष्ट्रातील पिके-२० पिकांची संपूर्ण माहिती.
Table about Crops,Soil,Rain in Maharashtra(Maharashtratil Pramukh Pike)-महाराष्ट्रातील पिके,उत्पादक जिल्हा,जमीन,पाऊस,हवामान,हंगाम याची माहिती तक्ता
पीकाचे नाव | उत्पादक जिल्हा | आवश्यक जमीन | आवश्यक पाऊस | आवश्यक हवामान | पिकाचा हंगाम |
---|---|---|---|---|---|
ज्वारी | महाराष्ट्र पठाराचा पश्चिम भाग | काळी कसदार | एक हजार मिलि | उबदार हवामान | खरीप |
गहू | महाराष्ट्र पठारावरील सर्वच जिल्हे | ओलावा टिकवून ठेवणारी | 600 ते 1000 मिलि | थंड हवामान | रब्बी |
तांदूळ | कोकण,नांदेड, यवतमाळ | गाळाची | एक हजार मिलिपेक्षा जास्त | उष्ण व दमट हवामान | खरीप |
बाजरी | पठारावरील सर्व जिल्हे | साधी | कमी | उष्ण हवामान | खरीप |
नाचणी आणि वरी | सह्याद्री पर्वताच्या उतार | साधी | मध्यम | उष्ण व दमट हवा | खरीप,रब्बी |
मका | पठारावरील सर्व जिल्हे | साधी | मध्यम | उबदार हवामान | खरीप ,रब्बी |
डाळीची पिके | औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हे | साधी | मध्यम | उबदार हवामान | खरीप |
पावटा,वाल, चवळी | कोकणातील जिल्हे | साधी | मध्यम | उष्ण व दमट हवामान | खरीप |
कापूस | नागपूर,औरंगाबाद, अमरावती, नाशिक विभाग | काळी कसदार | मध्यम | उबदार हवामान | खरीप |
ऊस | पठाराच्या पश्चिम भागातील जिल्हे | काळी कसदार | भरपूर | उष्ण हवामान | बारा महिने |
तेल बिया किंवा गळिताची धान्ये | नाशिक,औरंगाबाद, पुणे विभागातील जिल्हे | साधी | मध्यम | उबदार हवामान | खरीप हंगाम |
द्राक्षे | नाशिक, सांगली, जिल्हा | काळी कसदार | भरपूर | थंड आणि उबदार हवामान | खरीप,रब्बी |
केळी | जळगाव,नांदेड, परभणी,वसई | निचरा होणारी | भरपूर | उष्ण हवामान | खरीप, रब्बी |
संत्री | नागपूर जिल्हा | काळी कसदार | मध्यम | कोरडे हवामान | खरीप ,रब्बी |
नारळ | कोकणातील सर्व जिल्हे | काळी | भरपूर पाऊस | उष्ण व दमट हवामान | बारा महिने |
आंबा | रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे | मध्यम | भरपूर पाऊस | उष्ण व दमट हवामान | बारा महिने |
चिकू | घोलवड | मध्यम | भरपूर | उष्ण व दमट हवामान | बारा महिने |
कांदा | नाशिक | मध्यम | मध्यम | उष्ण व दमट हवा | रब्बी ,खरीप |
हळद आणि आले | सातारा,सांगली जिल्हा | काळी कसदार | भरपूर | उष्ण व दमट हवामान | खरीप |
पिके सर्वत्र सारखी का नाहीत ? Maharashtratil Pramukh Pike
मृदा किंवा जमीन
कोणतेही पीक मूलतः मातीवर अवलंबून असते. महाराष्ट्रात सगळीकडे सारख्या प्रकारची जमीन किंवा मृदा नाही.कोकण किनारपट्टीच्या भागात माती ही तांबड्या रंगाची सापडते.तर पठारी प्रदेशात मातीही काळ्या रंगाची आढळते.विदर्भामध्ये मातीही पुन्हा रंग बदलते आणि तांबड्या रंगाची माती आढळते.
पाऊस
राज्यात सगळीकडे सारख्या प्रकारचा पाऊस पडत नाही.किनारपट्टीच्या प्रदेशात पाऊस भरपूर पडतो. कोकणात सरासरी चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो.पर्वतीय प्रदेशात सुद्धा पाऊस भरपूर होतो. सह्याद्री कडून पूर्वेकडे जात असताना महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होत जाते.तर विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण वाढते.
महाराष्ट्रात सगळीकडे सारखे हवामान नाही.किनारपट्टीचा प्रदेश किनारपट्टीचा प्रदेशात हवा दमट असते.त्यामुळे तेथील हवामान उष्ण दमट असते आणि सम असते पर्वतीय प्रदेशात हवा थंड असल्यामुळे हवामान थंड असते.सर्व थंड हवेचे ठिकाणे पर्वती प्रदेशातच आढळतात.पठारी प्रदेश हा मध्यम उंचीचा भाग असल्यामुळे तेथील हवेत बाष्प कमी असते त्यामुळे तेथील हवा कोरडी असते म्हणून हवामान विषम असते.
पाणीपुरवठाच्या आधारे शेतीचे दोन प्रकार पडतात.
जिरायती शेती | बागायती शेती |
---|---|
जी शेती केवळ पावसाच्या पाण्यावर आधारित असते. म्हणजेच पावसाळ्यातील खरीप हंगाम. | शेती पावसाच्या पाण्याशिवाय इतर पाणीपुरवठा करून केली जाते. म्हणजेच रब्बी हंगाम |
शेतीच्या हंगामाचे प्रकार.
खरीप हंगाम | रबी हंगाम |
---|---|
ज्या काळातील पिके फक्त पावसाच्या पाण्यावर येतात तो काळ म्हणजे खरीप हंगाम | ही पिके पावसाच्या पाण्याशिवाय विहीर,तलाव,विंधन विहीर किंवा इतर सिंचनाच्या सोयी वर अवलंबून असतात तो हंगाम म्हणजे रब्बी हंगाम. |
कोकणातील पिके.
अन्नधान्याची पिके | डाळीची किंवा दविदल धान्य | फळे |
---|---|---|
तांदूळ,नाचणी, वरी | चवळी, वाल, पावटा | आंबा, चिकू, काजू, नारळ, सुपारी, फणस, बोर,पेरू,आवळा, सीताफळ आणि अंजीर |
पठारावरील पिके
अन्नधान्याची पिके | ज्वारी, गहू,तांदूळ, बाजरी, मका |
डाळीची पिके | तूर,मग,मटकी, उडीद,हरभरा, |
व्यापारी पिके | कापूस,ऊस,तेलबिया |
फळे | द्राक्षे,केळी,संत्री,डाळिंब |
भाजीपाला | वांगी,कोबी,टोमॅटो, बटाटे,पालेभाज्या |
मसाल्याचे पदार्थ | कांदा,आले,लसूण, मिरची,हळद,धने |
महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी साठी येथे क्लिक करा.