भारताची प्राकृतिक रचना किंवा स्वाभाविक विभाग.
bhartache prakrutik vibhag-भारताची प्राकृतिक रचना
प्राकृतिक रचना म्हणजे काय ? bhartache prakrutik vibhag
कोणत्याही भूभागातील पर्वत, डोंगररांगा, पठारे, मैदाने, दऱ्या, समुद्रकिनारे, समुद्रातील बेटे या सर्वांची एकत्रितपणे असलेली रचना म्हणजेच प्राकृतिक रचना होय.bhartache prakrutik vibhag स्वाभाविक रचनेचा तेथील मानवी जीवनावर वेगवेगळ्या तऱ्हेने परिणाम होत असतो.
मानवाचे जीवन हे तेथील प्राकृतिक रचनेवरच अवलंबून असते. भारत देशातील प्राकृतिक रचने विषयी आज अभ्यास करूया.
भारताचे प्राकृतिक रचनेनुसार पाच विभाग पडतात. bhartache prakrutik vibhag
- 1. उत्तर दिशेकडील पर्वतमय प्रदेश 2.उत्तर दिशेकडील भारतीय मैदानी प्रदेश 3.भारतीय पठारी प्रदेश 4.भारतीय किनारी मैदानी प्रदेश 5.भारतीय बेटे
उत्तर दिशेकडील पर्वतमय प्रदेश
भारताचा संपूर्ण उत्तरेकडील प्रदेश हा पर्वत रांगांनी तयार झाला आहे. त्यात मुख्यतः हिमालय पर्वताच्या रांगेचा समावेश आहे.
जम्मू काश्मीर ते अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालय पर्वत लांबच लांब पसरलेला आहे. हिमालय पर्वताचा काही भाग नेपाळ देशात सुद्धा आहे. याच भागात हिमालय पर्वताच्या समांतर अशा शिवालिक,हिमांचल आणि बृहद हिमालय या तीन पर्वत रांगा आहेत. सिपकी, जोझी, निती, काराकोरम, बनिहाल या खिंडी आहेत.
हिमालय पर्वतात के-2, गासेरग्रूम, नंगापर्वत,नंदादेवी,कांचन जंगा ही शिखरे आहेत.
हिमालयातील के-2 या शिखराची उंची 8611 मीटर आहे.हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे.
कांचनजंगा हे शिखर पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाते.त्याची उंची 8598 मीटर आहे. पत्कोई, नागा, लुशाई या पूर्वेकडील डोंगर रांगांना पूर्वांचल असे म्हटले जाते. मेघालय पठारावर गारो, खासि,जैतीया डोंगर रांगा आहेत.
हिमालय पर्वतामुळे उत्तर दिशेकडून येणारे थंड वारे मोठ्या प्रमाणावर अडवले जातात त्यामुळे भारतीय प्रदेशाचे संरक्षण होते.
उत्तर दिशेकडील भारतीय मैदानी प्रदेश
उत्तर दिशेकडील पर्वतमय प्रदेशाच्या दक्षिणेकडील साधारणतः दोनशे किलोमीटर पर्यंत प्रदेश हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो.
या प्रदेशाचे दोन भाग होतात.1.पंजाब व राजस्थान या प्रदेशाकडील पश्चिम मैदान 2.पूर्व भारताकडील पूर्व मैदान
- पश्चिमेकडील मैदानी प्रदेश-सतलज आणि तिच्या उपनद्यांनी आणलेल्या गाळापासून तयार झाला आहे. तेथे पावसाचे प्रमाण कमी आहे. पश्चिम मैदानाचा दक्षिण दिशेकडील भाग भारतीय महावाळवंट म्हणून ओळखले जाते. त्यात अनेक खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत.
- पूर्व मैदानी प्रदेश-गंगा आणि तिच्या उपनद्या,ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने तयार झाला आहे.या नद्या हिमालयात उगम पावल्याने या नद्यांना वारंवार पूर येतात.वाहून आणलेल्या गाळामुळे हा प्रदेश प्रचंड सुपीक बनला आहे.
भारतीय पठारी प्रदेश
हा भारतातील सर्वात मोठा प्राकृतिक विभाग आहे.नर्मदा आणि सोन या दोन नद्यांमुळे भारतीय पठाराचे दोन भाग पडतात. 1.उत्तर भारतीय पठार 2.दक्षिण भारतीय पठार
- उत्तर भारतीय पठार-या भागात मुख्यतः मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंड या भागाचा समावेश होतो.अरवली पर्वत या पठाराच्या वायव्य दिशेस आहे.अरवली पर्वताच्या ईशान्य दिसेल भागात सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. या पर्वतातील गुरुशिखर नावाचे शिखर सर्वात उंच शिखर आहे.त्याची उंची 1722 मीटर आहे. या पठारावरून चंबळ, शिंद, पेटवा, केन या नद्या तर दिशेकडे वाहतात आणि पुढे यमुना नदीला जाऊन मिळतात.
- दक्षिण भारतीय पठार-हे पठार अति प्राचीन खडकापासून बनलेले आहे.यात महाराष्ट्र पठार, तेलंगणाचे पठार, कर्नाटकाचे पठार यांचा समावेश होतो.यात सातपुडा पर्वत, सह्याद्री पर्वत यांचा समावेश होतो. दक्षिण भारतीय पठारास दख्खनचे पठार असे ऐतिहासिक नाव आहे.महाराष्ट्र पठारावर अजिंठा, बालाघाट, महादेव या डोंगर रांगा आहेत.अनैमुडी हे सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची 2695 मीटर आहे.पालघाट नावाच्या खिंडीमुळे सह्याद्री पर्वताचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात.या पठारावरील प्रमुख नद्या पूर्व दिशेला वाहतात.श्रीशैलम जवळील कृष्णा नदीने केलेली घळी प्रसिद्ध आहे.भारतीय पठारावर विपुल प्रमाणात खनिज संपत्ती सापडते.छोटा नागपूरचे पठार आणि अरवली पर्वताजवळ विपुल प्रमाणात खनिज संपत्ती सापडते. पठारावरील लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
किनारी मैदानी प्रदेश bhartache prakrutik vibhag
भारताच्या समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असणाऱ्या भागास मैदानी किनारी प्रदेश म्हणतात.त्याचे दोन भाग होतात 1.पूर्व किनारी प्रदेश 2.पश्चिम किनारी प्रदेश.
- पूर्व किनारी प्रदेश-पश्चिम बंगालचा उपसागरास लागून असलेला प्रदेश हा पूर्व किनारी मैदान म्हणून ओळखला जातो. हा प्रदेश अनेक नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांनी तयार झाला आहे. महानदी,गोदावरी,कृष्णा,कावेरी या नद्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. या मैदानात चिल्का,पुलिकत,कोल्हेरू इत्यादी सरोवरे आहेत.
- पश्चिम किनारी प्रदेश-अरबी समुद्राच्या लगत असलेल्या मैदानी प्रदेशास पश्चिम किनारी प्रदेश असे म्हणतात. गुजरात मधील कच्छच्या रणापासून कन्याकुमारी पर्यंत हा भाग पसरलेला आहे. या भागातील नद्या पश्चिम दिशेकडे वाहतात. या नद्यांच्या मुखाजवळ अनेक खाड्या तयार झाल्या आहेत. या भागात अनेक खाजन सरोवरे बनली आहे.वेंबनाड हे सर्वात मोठे खाजन सरोवर आहे.
भारतीय बेटे bhartache prakrutik vibhag
अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यात अनेक बेटांचे समूह हे भारतीय प्रदेशाचा भाग आहे.पश्चिम किनाऱ्यालगत दीव, लक्षद्वीप अशी अनेक बेटे आहेत.लक्षद्वीप बेटांची निर्मिती प्रवाळांच्या संचयनातून निर्माण झाली आहे.बंगालच्या उपसागरातील बेटे ही जलमग्न पर्वतांची शिखरे आहे.
ही बेटे विस्ताराने मोठी आहे.अंदमान निकोबार बेट हे त्यापैकी मुख्य आहे.अंदमान निकोबार बेटावरील सॅंडल नावाचे शिखर हे सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची 738 मीटर आहे.
अंदमान समूहाच्या बॅरन बेटावर एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
नद्या आणि त्यांच्यावरील धरणे यांची माहिती मिळवा .