महत्त्वाच्या 11 व्यक्तींची स्मृतिस्थळे
महत्त्वाच्या 11 व्यक्तींची स्मृतिस्थळे Bhartatil Mahtwachi 11 Smrutisthale
प्रत्येक देशातील महान व्यक्तीने जीवन भर केलेल्या कार्याचा सन्मान झाला पाहिजे. Bhartatil Mahtwachi 11 Smrutisthale, त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याची पुढील पिढीला ओळख झाली पाहिजे. म्हणून त्याच्या स्मृती स्थळाची निर्मिती केली जाते.
स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक नेत्यांची स्मृती स्थळे दिल्ली या ठिकाणी आहेत.अनेक महान नेत्यांची स्मृतीस्थळे भारतातील विविध ठिकाणी उभारलेली आहे.
भारतातील स्मृतीस्थळे Bhartatil Mahtwachi 11 Smrutisthale
राजघाट | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मृती स्थळ आहे.दिल्ली येथील यमुना नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर हे स्मृतिस्थळ आहे.या स्मृतीस्थळावर महात्मा गांधींचे शेवटचे शब्द ‘हे राम’ कोरलेले आहेत. |
शांतीवन | भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्मृतिस्थळ आहे. दिल्ली शहरातील यमुना नदीच्या किनाऱ्यावर सुमारे 52 एकर जागेवर हे शांतीवन बनवण्यात आले आहे. |
विजय घाट | भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे हे स्मृतिस्थळ आहे. भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाच्या स्मृती प्रित्यर्थ स्मृतीस्थळास विजय घाट नाव देण्यात आले आहे. |
शक्ती स्थळ | भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे शक्ती स्थळ हे स्मृतिस्थळ आहे. |
वीर भूमी | भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांचे हे स्मृतिस्थळ आहे. |
किसान घाट | भारताचे पाचवे पंतप्रधान चरण सिंग यांचे हे समाधी स्थळ आहे. |
समतास्थळ | बाबू जगजीवन राम यांचे हे समाधी स्थळ आहे. बाबू जगजीवन राम हे भारताचे माजी उपपंतप्रधान होते. |
एकतास्थळ | एकता स्थळ हे भारताचे सातवे राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांचे समाधी स्थळ आहे |
अभय घाट | अभय घाट हे भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे स्मृतीस्थळ आहे. अभय घाट हे गुजरात मधील अहमदाबाद येथे आहे. |
चैत्यभूमी | चैत्यभूमी हे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृती स्थळ आहे चैत्यभूमी हे मुंबई स्थित समुद्रकिनाऱ्यावरील दादर येथे आहे. |
प्रीती संगम | महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे प्रीती संगम हे स्मृतिस्थळ आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी प्रीती संगम हे स्मृतिस्थळ आहे. |
महाराष्ट्रातील महत्वाच्या समाजसुधारकांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.