maharshtrache mukhyamantri महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आतापर्यंत झालेले मुख्यमंत्री maharshtrache mukhyamantri यादी, सोबत नाव, कालावधी, एकूण दिवस, मतदारसंघ आणि राजकीय पक्ष याची माहिती दिलेली आहे.
- मुख्यमंत्री पदासाठीची पात्रता
- मुख्यमंत्री कामे
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी आणि माहिती-भाग-पहीला
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी आणि माहिती-भाग-दूसरा
- महाराष्ट्रातील राष्ट्रपति राजवटी
Qualification for Chief Minister-मुख्यमंत्री पदासाठीची पात्रता
- तो भारताचा नागरिक असावा.
- वयाची पंचवीस वर्ष पूर्ण असावी.
- तो व्यक्ति राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या लाभाच्या पदावर नसावा.
- विधिमंडळाचा सदस्य असावा.
- त्याच्याकडे बहुमत प्राप्त असावे.
Work of Chief Minister-मुख्यमंत्री कामे
- राज्यघटनेतील घटक राज्य सूची मधील दिलेल्या विषयावर कायदे तयार करणे.योग्य नियमावली तयार करणे.
- राज्यात विकासाच्या विविध योजना व कार्यक्रम आखणे.
- संपूर्ण राज्यात शांतता व सुव्यवस्था स्थापन करणे.
- प्रशासन चालवण्याची नियमावली तयार करणे.
- राज्य,केंद्र,विविध राज्य यांच्यात सतत संपर्क ठेवणे आणि समन्वय साधणे.
- राज्याच्या संपूर्ण प्रशासनावर नियंत्रण ठेवणे. मंत्रिपरिदेवर नियंत्रण ठेवणे.निर्देश देणे.
- मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याच्या विकासाचे धोरण ठरवणे व निर्णय घेणे.
- राज्याच्या विकासासाठी महसूल गोळा करणे आर्थिक स्थिती मजबूत ठेवणे.
- केंद्राच्या किंवा विविध केंद्र किंवा विविध स्तरावर वेगवेगळे करार करणे किंवा वाटाघाटी करणे.
- राज्यातील संपूर्ण कर्मचारी प्रशासन यांचे नेतृत्व करणे,नियंत्रण ठेवणे.
maharshtrache mukhyamantri महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी आणि माहिती
खालील अद्ययावत यादीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची नावे आणि त्यांचा कार्यकाळ दिला आहे:
| क्रमांक | मुख्यमंत्री | कार्यकालाचा कालावधी | पक्ष |
|---|---|---|---|
| 1 | यशवंतराव चव्हाण | 1 मे 1960 – 19 नोव्हेंबर 1962 | काँग्रेस |
| 2 | मारोतराव कन्नमवार | 20 नोव्हेंबर 1962 – 24 नोव्हेंबर 1963 | काँग्रेस |
| 3 | वसंतराव नाईक | 5 डिसेंबर 1963 – 20 फेब्रुवारी 1975 | काँग्रेस |
| 4 | शंकरराव चव्हाण | 21 फेब्रुवारी 1975 – 16 मे 1977 | काँग्रेस |
| 5 | वसंतदादा पाटील | 17 मे 1977 – 18 जुलै 1978 | काँग्रेस |
| 6 | शरद पवार | 18 जुलै 1978 – 17 फेब्रुवारी 1980 | पीजेपी (पीपल्स पार्टी) |
| 7 | ए. आर. अंतुले | 9 जून 1980 – 12 जानेवारी 1982 | काँग्रेस |
| 8 | बाबासाहेब भोसले | 21 जानेवारी 1982 – 1 फेब्रुवारी 1983 | काँग्रेस |
| 9 | वसंतदादा पाटील | 2 फेब्रुवारी 1983 – 1 जून 1985 | काँग्रेस |
| 10 | शिवाजीराव पाटील निलंगेकर | 3 जून 1985 – 6 मार्च 1986 | काँग्रेस |
| 11 | शंकरराव चव्हाण | 12 मार्च 1986 – 26 जून 1988 | काँग्रेस |
| 12 | शरद पवार | 26 जून 1988 – 25 जून 1991 | काँग्रेस |
| 13 | सुधाकरराव नाईक | 25 जून 1991 – 22 फेब्रुवारी 1993 | काँग्रेस |
| 14 | शरद पवार | 6 मार्च 1993 – 14 मार्च 1995 | काँग्रेस |
| 15 | मनोहर जोशी | 14 मार्च 1995 – 31 जानेवारी 1999 | शिवसेना – भाजप युती |
| 16 | नारायण राणे | 1 फेब्रुवारी 1999 – 17 ऑक्टोबर 1999 | शिवसेना |
| 17 | विलासराव देशमुख | 18 ऑक्टोबर 1999 – 16 जानेवारी 2003 | काँग्रेस |
| 18 | सुशीलकुमार शिंदे | 18 जानेवारी 2003 – 30 ऑक्टोबर 2004 | काँग्रेस |
| 19 | विलासराव देशमुख | 1 नोव्हेंबर 2004 – 4 डिसेंबर 2008 | काँग्रेस |
| 20 | अशोक चव्हाण | 8 डिसेंबर 2008 – 9 नोव्हेंबर 2010 | काँग्रेस |
| 21 | पृथ्वीराज चव्हाण | 11 नोव्हेंबर 2010 – 26 सप्टेंबर 2014 | काँग्रेस |
| 22 | देवेंद्र फडणवीस | 31 ऑक्टोबर 2014 – 8 नोव्हेंबर 2019 | भाजप |
| 23 | उद्धव ठाकरे | 28 नोव्हेंबर 2019 – 29 जून 2022 | शिवसेना (मविआ – महाविकास आघाडी) |
| 24 | एकनाथ शिंदे | 30 जून 2022 – 26 नोव्हेंबर 2024 | शिवसेना (शिंदे गट) – भाजप |
| 25 | देवेंद्र फडणवीस | 5 डिसेंबर 2024 – वर्तमान | भाजप |
“ महाराष्ट्रातील विविध लेखक,कवि,नाटककार,व्यक्ति यांची टोपण नावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा . “