CTET Exam 2022
CTET Exam Notification 2022
सर्व प्रकारच्या शाळेमध्ये वर्ग पहिली ते आठवी या वर्गांना शिकवण्यासाठी शिक्षकांना CTET परीक्षा आवश्यक आहे. CTET Exam Notification 2022 सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट CTET डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधी दरम्यान घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन भरावेत. सीटीईटी पात्रता प्रमाणपत्र हे शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी हयातभर ग्राह्य धरले जाते. या परीक्षेत कमीत कमी 60 टक्के गुण मिळवणारे उमेदवार उत्तीर्ण मानले जातील.
Eligibility for CTET Exam.
प्राथमिक शिक्षक पद वर्ग पहिली ते पाचवी.
1.इयत्ता बारावी कमीत कमी 50 टक्के गुणासह पास.
2.दोन वर्ष कालावधीचा एलिमेंट्री एज्युकेशन मधील डिप्लोमा किंवा पदवी प्राप्त असावी.
3.DELED/B.ED च्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
माध्यमिक शिक्षक पदासाठी वर्ग सहा ते आठवी
1.कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा किमान 45% गुणासह उत्तीर्ण असावी.
3.बारावीची परीक्षा किमान 50% गुणासह उत्तीर्ण असणारे B.A /B.SC B.Ed वर्गाच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
परीक्षा पद्धती
1.कॅम्पुटर बेस्ट टेस्ट साठी उमेदवारांना वीस भाषा पैकी कोणत्याही दोन भाषा निवडाव्या लागतील.
2.ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
3.प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल चुकीचा प्रश्नासाठी गुण वजा केले जाणार नाही.
4.पेपर पहिला प्राथमिक शिक्षक पहिली ते पाचवीसाठी आणि पेपर दुसरा सहावी ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी
5.एक उमेदवार दोन्हीही पेपर देण्यास पात्र आहे.
6.एकूण प्रश्न 150 असतील आणि 150 गुण असतील वेळ दोन तास 30 मिनिटे.
परीक्षा शुल्क
1.ओपन/ओबीसी उमेदवारांसाठी एक पेपर देण्यासाठी 1000/- रुपये दोन्ही पेपर साठी 1200/- रुपये.
2.एस.सी /एस.टी/दिव्यांग एका पेपर साठी रुपये 500/- आणि दोन्ही पेपर साठी 600/- रुपये
3.सर्वांसाठी परीक्षा फीस व्यतिरिक्त जीएसटी वेगळी आकारली जाईल.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज https://ctet.nic.in या संकेतस्थळावर भरावेत
CTET परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 24 नोव्हेंबर 2022.
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 25 नोव्हेंबर 2022. दुपारी 3.30 वाजेपर्यंत.
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांच्या अभ्यासासाठी येथे भेट द्या .