Current Affairs Date-01 September 2022
दाऊद इब्राहिमला पकडून देणारास 25 लाखाचे बक्षीस.Current Affairs 01 September
कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याला पकडून देणारास २५ लाखाचे बक्षीस राष्ट्रीय तपास संस्था ( एनआयए ) ने जाहीर केले आहे. सन 1993 साली मुंबई शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दाऊद इब्राहिम आरोपी आहे. Current Affairs 01 September या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था करत आहे. संयुक्त राष्ट्राने दाऊद इब्राहिम याला जागतिक आतंकवादी घोषित केले आहे. त्याच्यासह त्याचे इतर साथीदार छोटा शकील,अनिस इब्राहिम, जावेद चिकना, टायगर मेमन, हाजी इमाम या सर्वावर प्रत्येकी 15 लाख रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
पोर्तुगाल देशाच्या आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा
पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला म्हणून पोर्तुगाल देशाच्या आरोग्य मंत्री डॉ.मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला आहे. पोर्तुगाल देशाची राजधानी लिस्बन मधील सांता मारिया रुग्णालयात जागा न मिळाल्याने भारतीय महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यामुळे गर्भवती महिलेला वेळेवर उपचार मिळू शकले नाही. त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेची नैतिक जबाबदारी म्हणून डॉ.मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला.
ऑगस्ट-2022 या महिन्यातील संपूर्ण महिन्याच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा .