Current Affairs Date-02 September 2022
INS Vikrant dedicated to the nation.आयएनएस विक्रांत ही युद्धनौका देशाला अर्पण.Current Affairs 02 September
संपूर्णपणे भारतात तयार केलेली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते Current Affairs 02 September राष्ट्राला अर्पण करण्यात आली. हा सोहळा कोची शहराच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये संपन्न झाला.1971 मधील पाकिस्तान युद्धात शौर्य गाजवलेल्या विक्रांत या युद्धनौकेचे नाव या विमानवाहू युद्धनौकेस देण्यात आले आहे. ही युद्धनौका 262 मीटर लांब आणि 62 मीटर रुंद आहे.ताशी 28 सागरी मैल वेगाने ती युद्धनौका जाऊ शकते.या विमानवाहू युद्धनौका एकाच वेळी 30 विमाने वाहून नेऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेच्या आकारावरून प्रेरित होऊन नौदलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण यावेळी करण्यात आले.
Election of Kalyan Chaubey as President of All India Football Federation.अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कल्याण चौबे यांची निवड.
एआयएफएफ (All India Football Federation) म्हणजेच अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माजी गोल रक्षक खेळाडू कल्याण चौबे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय फुटबॉल महासंघाची प्रशासकीय समिती बरखास्त केली होती. भारतीय फुटबॉल महासंघाचे प्रफुल्ल पटेल हे माजी अध्यक्ष होते.
Social activist Tista Setalvad granted interim bail.सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना अंतरीम जामीन मंजूर.
2002 मध्ये गुजरात दंगलीतील काही जनाविरुद्ध खोटे पुरावे तयार केल्याच्या आरोपावरून तिस्ता सेटलवाड यांना अटक झाली होती.
सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मागील 25 जून 2022 रोजी त्यांना अटक करण्यात आली होती.
ऑगस्ट-2022 संपूर्ण महिन्याच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी येथे भेट द्या .