Current Affairs Date-05 September 2022
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी लिझ ट्रस यांची निवड Current Affairs 05 September
ब्रिटन देशाच्या नुकत्याच झालेल्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत 47 वर्षीय लिझ ट्रस यांची निवड झाली आहे. Current Affairs 05 September लिझ ट्रस या ब्रिटनच्या माजी परराष्ट्रमंत्री होत्या. ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सूनक यांचा त्यांनी पराभव करून यश मिळवले. एकूण मताच्या 57% मते घेऊन लिझ ट्रस यांनी विजय मिळवला.ब्रिटन देशाच्या इतिहासातील लिझ ट्रस या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.
चीन देशात भूकंप 21 लोक मृत्युमुखी Current Affairs 05 September
भारताच्या शेजारी असलेल्या चीन देशातील सिचूआन प्रदेशातील लुडींग या भागात भूकंपाचा मोठा धक्का बसून 21 लोकांचा मृत्यू झाला.चीनच्या वेळेनुसार सोमवारी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी हा भूकंप झाला.भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 6.8 एवढी होती.
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार.
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना सोमवारी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
दिल्लीमधील विज्ञान भवनात भारतीय शिक्षा मंत्रालयातर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे, पारगाव जोगेश्वरी मधील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ वाळके आणि मुंबई येथील छत्रभुज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता संगवी यांचा समावेश आहे.
देशभरातील 45 शिक्षकांना 2022 सालचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले.एकूण शिक्षकांपैकी 18 महिला शिक्षिका आहेत.
महाराष्ट्रा बाहेर शिकणाऱ्या ओबीसी व इतर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द Current Affairs 05 September
महाराष्ट्र राज्याच्या बाहेर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या व्हीजेएनटी,एसबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारी शिष्यवृत्ती रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.महाविकास आघाडीने 25 मार्च 2022 रोजी या संदर्भातील शासन निर्णय काढला होता.सध्याच्या शिंदे सरकारने हा निर्णय रद्द करण्याचा आदेश 2 ऑगस्ट 2022 रोजी काढला आहे.
झारखंड मधील हेमंत सोरेन सरकार वरील विश्वास दर्शक ठराव मंजूर.
झारखंड राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विधानसभेमध्ये मांडलेला विश्वास दर्शक ठराव जिंकला आहे.सध्या झारखंड विधानसभेत 81 सदस्य आहे.
विश्वास ठरावाच्या बाजूने 48सदस्यांनी आपले मत दिले.
दिनांक चार सप्टेंबर 2022 च्या चालू घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.