Current Affairs Date-22 August 2022
भारतीय बुद्धिबळ पटू आर.प्रज्ञानंदनने मॅग्नस कार्लसन याला हरवले.Current Affairs Date-22 August
भारतीय बुद्धिबळ पटू आर.प्रज्ञानंदनने मॅग्नस कार्लसन याला हरवले– मीयामी येथे पार पडलेल्या एफ टी एक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेत Current Affairs 22 August जगतजेता असलेल्या मॅग्नस कार्लसन याला फक्त सतरा वर्षीय भारतीय बुद्धीबळ पटू आर प्रज्ञानंदनने हरवले.सर्वाधिक गुणाच्या आधारे विजेतेपद प्राप्त केले.
मागील सहा महिन्यात प्रज्ञानंदनने कार्लसन याला तीन वेळा हरवले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय स्थापन करणार विशेष खंडपीठ.
महाराष्ट्रातील राजकीय आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे.महाराष्ट्र शासनाने केलेल्या पुनर्विचार याचीकेवर सुनावणी झाली. 20 आणि 28 जुलैला दिलेल्या निर्णयात बदल करावा अशी याचिका महाराष्ट्र शासनाने केली होती.सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मान्य न करत यावर निर्णय घेण्यासाठी पुढील पाच आठवड्यात विशेष खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्यात होणार सायबर गुप्तचर विभागाची स्थापना.
महाराष्ट्र राज्य सायबर गुन्ह्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे.या सायबर गुन्ह्याचा तपास संपूर्णपणे योग्य पद्धतीने व्हावा.
आधुनिक तंत्रज्ञानाचा पूर्णपणे वापर करून सायबर गुन्हे तपासले जावेत त्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर गुप्तचर विभागाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
रोज बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या सोबत काम करणारे तांत्रिक काम करणारे अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षित करून या विभागाचे काम केले जाईल.
कवी विद्वान यांना उत्पन्नावर आयकरासहित जीएसटी सुद्धा द्यावा लागणार.
विविध क्षेत्रातील विद्वान तसेच कवी,अतिथी शिक्षक यांच्या उत्पन्नावर आयकर द्यावा लागत होता.
त्याच सोबत नवीन निर्णयानुसार आता आयकरा सोबत 18% जीएसटी सुद्धा द्यावा लागेल.
25 लाख वार्षिक कमाई केली असेल तर त्यावर लाख आयकर आणि 90 हजार रुपये जीएसटी भरावे लागतील.
महाराष्ट्रातील विविध कवि आणि लेखक यांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.