Current Affairs Date-25 August 2022
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या SEL संचालक (कार्मिक) पदी कृष्णकुमार सिंह यांची नियुक्ती Current Affairs 25 August
भारत सरकारच्या मालकी असलेल्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच सेल या कंपनीच्या संचालक पदी(कार्मिक) कृष्णकुमार सिंह यांची Current Affairs 25 August नियुक्ती करण्यात आली आहे. मानव संसाधन, विकास,प्रशासन आणि इतर अनेक महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये त्यांना 35 वर्षाचा मोठा अनुभव आहे. रेल्वे,विमान,इंजिनिअरिंग विविध घरगुती निर्माणच्या मोठ्या पोलादी वस्तु बनवण्याचे काम ही कंपनी करते.
भारत देशाच्या सार्वजनिक उद्योगातील ही अत्यंत महत्वाची कंपनी आहे. सेल ही भारतातील लोह उत्पादन करणारी सर्वात मोठी दुसरी कंपनी आहे.
सेल ही देशातील दहा सर्वात मोठ्या कंपन्या पैकी एक मोठी कंपनी आहे.
आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (आय.एम.एफ) च्या संचालक पदी डॉक्टर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची नियुक्ती Current Affairs 25 August
आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाच्या संचालक पदी डॉ.कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी मागील काळात अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.
डॉ.सुब्रमण्यम पुढील तीन वर्षापर्यंत या पदावर कार्यरत राहतील.भारत सरकारचे सर्वात तरुण आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची ओळख आहे.
ते देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार होते.
अनुदान घेणाऱ्या सर्व खत कंपन्यांना आता सारख्याच पोत्यांची छपाई करावी लागणार Current Affairs 25 August
भारत सरकारच्या पंतप्रधान जन खत योजनेअंतर्गत केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालय विविध खत कंपन्यांना शेतकऱ्यांसाठी अनुदान देते.यापुढे अनुदान घेणाऱ्या सर्व कंपन्यांना आपल्या पोत्यांची छपाई ही सारख्याच रंगात करावी लागणार आहे.
अनुदान घेणाऱ्या सर्व कंपन्यांना पोत्यावरील 75% भागावर मंत्रालयाने ठरवून दिलेला मजकूर छापावा लागणार आहे.खताच्या पोत्यावरील 75 टक्के भागावर पंतप्रधान जन खत योजनेचा स्पष्ट शब्दात उल्लेख करावा लागेल.त्याच सोबत खताची किंमत,सरकारने दिलेले अनुदान आणि खताच्या विक्रीची किंमत याचा ठळक अक्षरात उल्लेख करणे बंधनकारक केले आहे.
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरी उपांत्य फेरीत एचएस प्रनॉय यांची धडक.
टोक्यो येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य पूर्व सामन्यात भारतीय खेळाडू एचएस प्रनॉय यांनी धडक मारली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या विजेत्या असलेल्या लक्ष सेन याला त्याने नमवले आणि पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
उपांत्य पूर्व फेरीत चीनच्या झाओ जून पेंग याच्याशी त्याला सामना करावा लागेल.
स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या विविध घटका वर आधारित चाचण्यांचा सराव करण्यासाठी येथे भेट द्या.