First in Maharashtra-महाराष्ट्रातील पहिले व्यक्ति,ठिकाण
First in Maharashtra-महाराष्ट्रातील प्रथम-व्यक्ति,ठिकाण,
पहिले व्यक्ति (First in Maharashtra) या भागात महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री ठिकाण,व्यक्ति,राज्यपाल याची महत्वपूर्ण माहिती घेण्यात आली आहे.
Person First in Maharashtra-पहिले व्यक्ति
राज्यपाल | श्रीप्रकाश | २०.१२.१९५६ ते १६.०४.१९६२ |
मुख्यमंत्री | यशवंतराव चव्हाण | जन्म 12.03.1913 महाराष्ट्रातील कराड |
विद्यापीठ | मुंबई विद्यापीठ | स्थापना 18.07.1857 पहिले कुलगुरू जॉन विल्सन |
पक्षी अभयारण्य | कर्नाळा ता.पनवेल | |
महिला रेल्वे इंजिन चालक | श्रीमती सुरेखा भोसले | 1988 मध्ये लग्नानंतर नाव सुरेखा यादव |
शिक्षिका आणि मुख्याध्यापिका | सावित्रीबाई फुले | ज्योतिराव फुले यांच्या सोबत महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा |
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती | वि.स.खांडेकर | 1974 मध्ये प्राप्त ययाती या कादंबरीसाठी |
भारतरत्न विजेते | धोंडो केशव कर्वे | |
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष– | न्यायमूर्ती रानडे | साहित्य संमेलन 1878 पुणे |
एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती | श्री सुरेंद्र चव्हाण | 1998 मध्ये एव्हरेस्ट शिखर सर |
रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त व्यक्ती | श्री.विनोबा भावे | |
राष्ट्रपती पदक विजेते साहित्यिक | आचार्य अत्रे | 1953 साली |
मराठी चित्रपट | अयोध्येचा राजा | निर्मिती व्ही.शांताराम |
Place the First-प्रथम ठिकाण
दैनिक वर्तमानपत्र-ज्ञानप्रकाश हे पहिले दैनिक वर्तमानपत्र होय.
कापड गिरणी-बॉम्बे स्पिनिंग मिल या नावाची पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू झाली. 07.07.1854 या दिवशी मुंबईतील कावसजी दावर यांनी आपली स्वतःची कापड गिरणी सुरू केली.
कृषी विद्यापीठ-राहुरी जिल्हा अहमदनगर येथे पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ या नावाने स्थापन करण्यात आले.या विद्यापीठाची स्थापना 1968 साली करण्यात आली.
साखर कारखाना-प्रवरानगर जिल्हा अहमदनगर येथे पहिला साखर कारखाना स्थापन करण्यात आला.
या साखर कारखान्याची निर्मिती पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी केली.या कारखान्याची निर्मिती दिनांक 31 डिसेंबर 1950 रोजी करण्यात आली.
जलविद्युत केंद्र-खोपोली जिल्हा रायगड येथे पहिले जलविद्युत केंद्र आहे.या विद्युत केंद्राची निर्मिती 9 फेब्रुवारी 1915 रोजी करण्यात आली.
अनु विद्युत केंद्र-तारापूर येथे पहिले अनु विद्युत केंद्र आहे सध्या पालघर जिल्ह्यात असलेल्या तारापूर येथे 1969 रोजी भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प राबवण्यात आला .
पवन विद्युत प्रकल्प-जमसंडे देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे पहिला पवन विद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.या प्रकल्पाची सुरुवात 1994 साली करण्यात आली.
उपग्रह दळणवळण केंद्र-आर्वी जिल्हा पुणे येथे पहिले उपग्रह दळणवळण केंद्र स्थापन करण्यात आले आहे.हे केंद्र 1971 पासून कार्यरत आहे.
लोह पोलाद प्रकल्प-चंद्रपूर येथे पहिला लोह पोलाद प्रकल्प कार्यरत आहे.
पंचतारांकित हॉटेल-हॉटेल ताजमहल याची मुंबई येथे सुरुवात 1903 रोजी करण्यात आली.
मुलींची शाळा-पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली
सैनिकी शाळा-सातारा येथेपहिली सैनिकी शाळा 1961मध्ये सुरु करण्यात आली.
दुरदर्शन केंद्र-मुंबई हे पहिले दुरदर्शन केंद्र आहे.या केंद्राची सुरुवात 2ऑक्टोबर 1972 रोजी करण्यात आली.
वाफेचे इंजिन-ठाणे ते मुंबई या रेल्वे मार्गावर महाराष्ट्रात पहिले प्रवासी रेल्वेचे वाफेचे इंजिन धावले.18.04.1853 रोजी या पहिल्या रेल्वेमार्गाची सुरुवात झाली.
आकाशवाणी केंद्र-23 जुलै 1927 रोजी मुंबई येथे पहिले आकाशवाणी केंद्राचा शुभारंभ झाला.
मे 1932 रोजी हे केंद्र ऑल इंडिया रेडिओ या नावाने सुरू करण्यात आले.
“महाराष्ट्रातील विविध अभयारण्ये जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.”