महाराष्ट्रातील प्रमुख 11 खनिजे आणि उपयोग
Maharashtratil Pramukh Khanij Sampatti-महाराष्ट्रातील प्रमुख 11 खनिजे आणि उपयोग
महाराष्ट्र राज्यात अनेक प्रकारची खनिज संपत्ती सापडते.Maharashtratil Pramukh Khanij Sampatti महाराष्ट्राच्या सर्वच भागात सापडत नाही. कारण महाराष्ट्राचा खूप मोठा भाग हा बेसॉल्ट खडकांनी तयार झाला आहे. बेसॉल्ट अतिशय मजबूत असा खडक आहे. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती ही पूर्व महाराष्ट्र आणि नैऋत्य महाराष्ट्र या भागात आढळते. पूर्व महाराष्ट्र म्हणजेच विदर्भ आणि नैऋत्य महाराष्ट्र म्हणजे कोकणाच्या दक्षिणे कडील भाग. या ठिकाणी खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर सापडते. विदर्भ आणि कोकणामध्ये जांभा खडक असल्यामुळे तेथे मुबलक खनिज संपत्ती आहे. खनिज संपत्ती ही जमिनीतून खोदून काढली जाते म्हणून त्या कामाला खाणकाम असे म्हटले जाते. ज्या भागात मुबलक खनिज संपत्ती आहे त्या भागात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो.
खनिजे त्यांचे उपयोग आणि सापडणारे जिल्हे Maharashtratil Pramukh Khanij Sampatti And Uses
खनिजाचे नाव | खनिजाचा उपयोग | सापडणारे जिल्हे |
मँगनीज | लोखंड आणि पोलाद उद्योगात,बॅटरी उद्योगात,रंग बनवणे,जंतुनाशक बनवणे,काच सामान बनवणे,औषध निर्माण करणे. | नागपूर,गोंदिया,भंडारा,सिंधुदुर्ग |
लोह खनिज | अशुद्ध लोखंड आणि पोलाद यांना शुद्ध लोखंड आणि शुद्ध पोलाद बनवणे . | चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग |
बॉक्साईट | बॉक्साईट हे खनिज ॲल्युमिनियम बनवणे. | सिंधुदुर्ग,रत्नागिरी,कोल्हापूर,रायगड |
चुनखडक | रसायन निर्मिती उद्योगात आणि सिमेंटबनवणे . बांधकामासाठी लागणारा चुना बनवणे . | भंडारा,सिंधुदुर्ग,रत्नागिरी |
डोलोमाईट | लोखंड आणि पोलाद निर्मिती | यवतमाळ,रत्नागिरी |
सिलिका (गारगोटी) | काच कामासाठी वापरले जाते. | सिंधुदुर्ग |
दगडी कोळसा | दगडी कोळसा हा वीज निर्मितीसाठी औष्णिक विद्युत निर्मिती | नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर |
तांबे | तांब्याच्या वस्तू बनवणे . | चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया |
अभ्रक | विजेच्या वेगवेगळ्या साहित्य निर्मिती औषध निर्मिती क्षेत्र | नागपूर,चंद्रपूर, सिंधुदुर्ग |
जिप्सम (प्लास्टर ऑफ पॅरिस) | सिमेंट आणि रंग काम मुर्त्या बनवण्यामध्ये,घर सजावटीसाठी | पुणे,सिंधुदुर्ग |
महाराष्ट्रातील विविध अभयारण्याची माहिती जाणून घ्या. येथे क्लिक करा .