नोबेल पुरस्कार-2022
Nobel Prize 2022-नोबेल पुरस्कार
अल्फ्रेड नोबेल…. Nobel Prize 2022 जागतिक स्तरावरील सर्वात मानाचे समजले जाणारे नोबेल पुरस्कार यांच्याच नावावरून दिले जातात.अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1833 मध्ये स्वीडन या देशातील स्टॉकहोम येथे झाला. त्यांनी आपले शिक्षण अमेरिका आणि फ्रान्स या देशात पूर्ण केले. त्यांना रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयात रस होता. त्यांनी डायनामाइट या स्फोटकांचा शोध लावला.त्यांनी डायनामाइट नावाच्या स्फोटकांचा जरी शोध लावला असेल तरी त्यांना जागतिक शांतता आणि समाजकार्यात रस होता.आपल्या आयुष्यात कमावलेली जवळपास सर्वच संपत्ती जागतिक स्तरावरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देण्यासाठी मृत्युपत्राद्वारे दान केली. त्यांनी दान केलेल्या संपत्तीतूनच जागतिक स्तरावरील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येतात.अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू 10 डिसेंबर 1986 या दिवशी झाला.मृत्युपत्रातील इच्छेनुसार मृत्यूनंतर पाच वर्षांनी 1905 पासून नोबेल पुरस्कार Nobel Prize 2022 देण्याची सुरुवात झाली.
“prizes to those who, during the preceding year, have conferred the greatest benefit to humankind”
अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्युपत्रातील काही ओळी..
नोबेल पुरस्कार खालील क्षेत्रात दिले जातात.Nobel Prize 2022
नोबेल पुरस्कार हे खालील सहा क्षेत्रात मागील बारा महिन्यात अत्युच् काम करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केले जातात.
- भौतिक शास्त्र
- रसायन शास्त्र
- रसायन शास्त्र
- साहित्य
- जागतिक शांतता
- अर्थशास्त्र
नोबेल पुरस्काराचे स्वरूप Nobel Prize 2022
अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कार प्राप्त व्यक्तींना 1.नोबेल मानपत्र, 2.नोबेल पदक, 3.रोख रक्कम म्हणजेच 90 लाख स्वीडिश क्रोना याचाच अर्थ भारतीय रुपया मधील 7.65 कोटी रुपये.
2022 या वर्षाचे नोबेल पुरस्कार
भौतिक शास्त्र | 1. एलेन एसपेक्ट | फ्रांस |
2. जॉन एफ क्लोसर | अमेरिका | |
3. एंटॉन जीलिंगेर | ऑस्ट्रिया | |
रसायन शास्त्र | 1. कैरोलीन बतोर्जि | अमेरिका |
2. बैरी शारप्लेस | अमेरिका | |
3. मोर्तन मेल्डल | डेन्मार्क | |
वैद्यक शास्त्र किंवा जीवशास्त्र | 1. स्वॉन्ते पैबो | स्वीडन |
साहित्य | 1. एनी एनॉक्स | फ्रांस |
जागतिक शांतता | 1. एलेस बियालीयातस्की | बेलारस |
2. मेमोरियल (संस्था) | रूस | |
3. सेंटर फॉर सिव्हिल लिबरटीज (संस्था) | युक्रेन | |
अर्थशास्त्र | 1. बेन एस बरनांकी | अमेरिका |
2. डगलस डब्ल्यू डायमंड आणि | अमेरिका | |
3. फिपिप एच डिब्विग | अमेरिका |
विविध परीक्षेच्या भारत देशाच्या भूगोलाविषयी महत्वाच्या घटकासाठी येथे क्लिक करा .