Perimeter-परिमिति
What is Perimeter parimiti-परिमिति
कोणत्याही आकृतीला आपला स्वतःचा आकार असतो.लांबी रुंदी उंची असते. Perimeter parimiti कोणतीही आकृतीही सर्व बाजूंनी बंद झाल्यावर त्या आकृतीला आपला स्वतःचा आकार प्राप्त होतो.जी आकृती सर्व बाजूने बंद नसते तिला आकार प्राप्त होत नाही.स्वतंत्र आकार असलेल्या आकृतीची परिमिती कशी काढावी ? हे खालील भागात स्पष्ट केले आहे.
- What is Perimeter (parimiti) ? परीमिती म्हणजे काय ?
- Perimeter of triangle ?त्रिकोणाची परिमिती
- Perimeter of square ?चौरसाची परिमीती
- Perimeter of rectangle ?आयताची परीमिती
- Perimeter of Polygon shape बहुभुजाकृती ची परिमिती
What is Perimeter parimiti ? परीमिती म्हणजे काय ?
कोणत्याही आकाराच्या परंतु बंद असलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची केलेली बेरीज म्हणजेच त्या आकृतीची परिमिती होय.उदाहरणार्थ एखाद्या शेताला कुंपण करायचे असेल तर एकूण किती लांबीची तार लागेल हे शोधणे म्हणजेच त्या शेताची परिमिती काढणे. शेताच्या आतील भाग किती आकाराचा आहे याचा परिमितीशी काहीही संबंध नाही. बाहेरील सर्व बाजू त्या कमी लांब असतील,सरळ रेषेत असतील,वाकड्या रेषेत असतील.त्या सर्व बाजूंची लांबी मोजणे म्हणजेच परिमिती होय.याचाच अर्थ त्या आकृतीच्या सर्व बाजूची लांबी एकत्रितपणे मोजणे ही परिमिती असते.
Perimeter parimiti of triangle ?-त्रिकोणाची परिमिती
तीन बाजू असलेल्या बंद आकृतीला त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाला कमी,जास्त किंवा सारख्या आकाराच्या तीन बाजू असतात.त्या तीनही बाजूच्या लांबीची एकत्रितपणे केलेली बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती Perimeter parimiti होय.
त्रिकोणाची पारीमिती = पहिली बाजू + दूसरी बाजू + तिसरी बाजू
Perimeter of square ?-चौरसाची परिमीती
चार बाजूने बंद असलेल्या आकृतीला चौरस असे संबोधले जाते.चौरसाच्या चारही बाजू या समान आकाराच्या लांबीच्या असतात.सर्व समान बाजूंच्या लांबीची बेरीज ही चौरसाची परिमिती Perimeter parimiti असते.
चौरसाची परिमिती = 4 × एका बाजूची लांबी.
Perimeter of rectangle ?-आयताची परीमिती
चौरसाप्रमाणेच आयत हा चार बाजूने तयार झालेला असतो. परंतु आयताच्या चारही बाजू समान लांबीच्या नसतात.समोरासमोरील दोन बाजू समान लांबीच्या उर्वरित दोन बाजू समान लांबीच्या असतात.
आयताची परिमिती = 2 × लांबी + 2× रुंदी
Perimeter of Polygon shape-बहुभुजाकृतीची परिमिती
एखाद्या आकृतीला चार बाजूपेक्षा जास्त बाजू असतात.त्या आकृतीला बहुभुजाकृती असे म्हणतात.त्या आकृतीची परिमिती म्हणजे असणाऱ्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच त्या आकृतीची परिमिती होय.उदाहरणार्थ. षटकोन,अष्टकोन यांची परिमिति म्हणजे आकृत्यांच्या सहा बाजू किंवा आठ बाजू यांची बेरीज होय.
अपूर्णांक म्हणजे काय ? अपूर्णांकबद्दल संपूर्ण माहिती येथे जानुन घ्या.