महाराष्ट्रातील नद्या व उपनद्या
शेवटचे अद्यतन दिनांक:१४ नोव्हेंबर २०२६

महाराष्ट्र अनेक नद्या व उपनद्या Maharashtratil Nadya Upnadya यांनी संपन्न असा प्रदेश आहे. महाराष्ट्र पठार,कोकण या भागातील नद्या,उपनद्या यांचा अभ्यास खाली करण्यात आला आहे.
नद्या आणि उपनद्या Maharashtratil Nadya Upnadya
| विभाग | नदीचे नाव | उपनद्याची नावे |
|---|---|---|
| महाराष्ट्र पठार | गोदावरी | प्रवरा, दारणा, दुधना, मांजरा, सिंदफणा, पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती |
| तापी | पूर्णा, गिरणा, पांझरा, बोरी, वाघूर, अनेर | |
| कृष्णा | कोयना, वेण्णा, येरळा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, भीमा | |
| भीमा | इंद्रायणी, भामा, मुळा-मुठा, घोड, कुकडी, नीरा, माण, सीना | |
| विदर्भ | वैनगंगा | कन्हान |
| पैनगंगा | अडाण, अरुणावती, कयाधू | |
| प्राणहिता | वैनगंगा व वर्धा यांच्या संगमाने तयार होते आणि पुढे गोदावरीला मिळते | |
| कोकण | वैतरणा | सुर्या,पिंजाळ,तानसा आणि दरहेजा |
| उल्हास | बारवी, काळू, भातसा, मुरबाडी, वालधुनी | |
| इतर | सावित्री, वशिष्ठी, वाघोटन, काजळी, तेरेखोल, कुंडलिका, अंबा, शास्त्री, जगबुडी |
काटेपूर्णा आणि मोरणा या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत (म्हणजे तापीच्या उपनदीच्या उपनद्या). तापीची पूर्णा आणि गोदावरीची पूर्णा या दोन वेगळ्या नद्या आहेत.
| नदी | उगम | एकूण लांबी (किमी) | वाहण्याची दिशा | मुख (कोठे मिळते) |
|---|---|---|---|---|
| गोदावरी | त्र्यंबकेश्वर (नाशिक) | 1465 | पूर्ववाहिनी | बंगालचा उपसागर (आंध्र प्रदेश) |
| कृष्णा | महाबळेश्वर (सातारा) | 1400 | पूर्ववाहिनी | बंगालचा उपसागर |
| भीमा | भीमाशंकर (पुणे) | 861 | आग्नेयवाहिनी | कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णेला मिळते |
| तापी | मुलताई (बैतूल, मध्य प्रदेश) | 724 | पश्चिमवाहिनी | अरबी समुद्र (खंभातचे आखात, गुजरात) |
| वैनगंगा | सिवनी (मध्य प्रदेश) | सुमारे 580 | दक्षिणवाहिनी | वर्धेला मिळून प्राणहिता तयार होते |
| वर्धा | सातपुडा रांग, मुलताईजवळ (मध्य प्रदेश) | सुमारे 528 | दक्षिण/आग्नेयवाहिनी | वैनगंगेसह प्राणहिता |
| पैनगंगा | अजिंठा डोंगररांग | सुमारे 676 | आग्नेयवाहिनी | वर्धा नदीला मिळते |
| वैतरणा | त्र्यंबकेश्वर (नाशिक) | 154 | पश्चिमवाहिनी | अरबी समुद्र (दातीवरे खाडी, पालघर) |
| उल्हास | सह्याद्री, राजमाची/लोणावळ्या जवळ | सुमारे 122 | पश्चिमवाहिनी | अरबी समुद्र (वसईची खाडी) |
महाराष्ट्रातील लांबी (मोठ्या चार नद्या)
| नदी | महाराष्ट्रातील लांबी (सुमारे) |
|---|---|
| गोदावरी | 668 किमी |
| भीमा | 451 किमी |
| कृष्णा | 282 किमी |
| तापी | 208 किमी |
- प्राणहिता: वैनगंगा आणि वर्धा यांच्या संगमाने तयार होते आणि पुढे तेलंगणात गोदावरीला मिळते. तिचा स्वतंत्र उगम नाही.
- गोदावरी आणि वैतरणा: दोन्ही नद्यांचा उगम त्र्यंबकेश्वर येथे आहे. गोदावरी पूर्वेकडे आणि वैतरणा पश्चिमेकडे वाहते. ही जोडी परीक्षेत वारंवार विचारली जाते.
- पश्चिमवाहिनी नद्या: तापी आणि कोकणातील सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात. बाकीच्या मोठ्या नद्या पूर्वेकडे वाहून बंगालच्या उपसागराला मिळतात.
नदीकाठची प्रमुख शहरे
| नदी | नदीकाठची शहरे |
|---|---|
| गोदावरी | नाशिक, त्र्यंबकेश्वर, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड |
| कृष्णा | वाई, कराड, सांगली |
| भीमा | पंढरपूर (येथे “चंद्रभागा”) |
| तापी | भुसावळ, सुरत (गुजरात) |
| वैनगंगा | भंडारा, पवनी |
| वर्धा | बल्लारपूर |
| मुळा-मुठा (भीमेची उपनदी) | पुणे |
| उल्हास | कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण |
| सावित्री | महाड |
| वशिष्ठी | चिपळूण |
| कुंडलिका | रोहा |
नद्यांवरील प्रमुख धरणे
| धरण | नदी | जिल्हा / राज्य |
|---|---|---|
| जायकवाडी (नाथसागर) | गोदावरी | छत्रपती संभाजीनगर (पैठण) |
| विष्णुपुरी | गोदावरी | नांदेड |
| गंगापूर | गोदावरी | नाशिक |
| भंडारदरा | प्रवरा | अहिल्यानगर |
| कोयना | कोयना | सातारा |
| धोम | कृष्णा | सातारा |
| चांदोली (वारणा) | वारणा | सांगली |
| राधानगरी | भोगावती | कोल्हापूर |
| उजनी | भीमा | सोलापूर / पुणे |
| खडकवासला | मुठा | पुणे |
| मुळशी | मुळा | पुणे |
| भाटघर, वीर | नीरा | पुणे |
| हतनूर | तापी | जळगाव |
| उकाई, काकरापार | तापी | गुजरात |
| गोसीखुर्द | वैनगंगा | भंडारा |
| अप्पर वर्धा | वर्धा | अमरावती |
| मोडकसागर, अप्पर वैतरणा | वैतरणा | ठाणे / नाशिक |
| तानसा | तानसा | ठाणे |
| भातसा | भातसा | ठाणे |
प्रमुख नद्या व महत्वाची माहिती Maharashtratil Nadya Upnadya
गोदावरी नदी
गोदावरी नदीला दक्षिणेतील गंगा म्हणून ओळखले जाते. गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. ही नदी पूर्व दिशेला वाहणारी नदी आहे. पूर्वेला बंगालच्या उपसागराला समुद्राला जाऊन मिळते. गोदावरीची लांबी सुमारे 1465 किलोमीटर आहे. गोदावरी नदीवर अनेक प्राचीन शहरे वसलेली आहेत. नाशिक,कोपरगाव,पैठण,गंगाखेड,नांदेड ही महाराष्ट्रातील प्रमुख शहरे आहेत. गोदावरी नदी ही नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्यात प्रवेश करते. पैठण शहराजवळ जायकवाडी हे धरण बांधण्यात आले आहे. पुढे नांदेड जवळ विष्णुपुरी धरण बांधण्यात आले आहे. विष्णुपुरी धरणामुळे नांदेड शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.
तापी नदी
ही महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेतील नदी आहे.तापी नदी पश्चिम वाहिनी म्हणून ओळखली जाते. तापी नदीचे उगम स्थान हे मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मूलताई हे आहे. तापी ही मध्यप्रदेशातून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. नदीची लांबी 724 किलोमीटर आहे. सातपुडा डोंगर रांगामधील अनेक छोट्या नद्या तापी नदीला मिळतात.
कृष्णा नदी
कृष्णा नदी ही सांगली,सातारा,कोल्हापूर या जिल्ह्यातील मुख्य नदी आहे.सांगली,सातारा,कोल्हापूर या जिल्ह्यात कृष्णा नदीचे पाणलोट क्षेत्र आहे.कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे.महाबळेश्वर येथून ही नदी पूर्व दिशेला वाहते.महाराष्ट्रातील कमी भागात ही नदी वाहून पुढे कर्नाटक,तेलंगाना,आंध्रप्रदेश या राज्यातून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.कृष्णा नदीची लांबी सुमारे 1400 किलोमीटर आहे.
भीमा नदी
भीमा नदी भीमाशंकर जवळ उगम पावते. या नदीला पंढरपूर जवळ चंद्रभागा नदी असे म्हणतात.पुणे,अहमदनगर,सातारा,सोलापूर जिल्ह्यातून ही नदी वाहते. भीमा नदीवर उजनी धरण प्रमुख धरण आहे. भीमा नदी कर्नाटकमध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते.
वैनगंगा नदी
वैनगंगा नदी महाराष्ट्राच्या अति पूर्व भागात वाहते.विदर्भाच्या पूर्व भागात ही नदी पूर्वेकडून दक्षिणेकडे वाहते. विदर्भातील घनदाट वनांनी आणि डोंगर युक्त भागातून ही नदी वाहते. वैनगंगा नदी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रवेश करते. भंडारा व गडचिरोली जिल्हयातून महाराष्ट्राच्या सीमेजवळ वैनगंगा + वर्धा → प्राणहिता → गोदावरी नदीला मिळते.
पैनगंगा नदी
पैनगंगा नदी ही मध्य विदर्भातील प्रमुख नदी आहे. विदर्भाच्या बुलढाणा,यवतमाळ,वर्धा जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्यातून ही नदी वाहते. चंद्रपूरनजीक पैनगंगा ही प्राणहिता नदीला मिळते. ही विदर्भातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे .
कोकणातील नद्यांची माहिती
कोकणातील सर्व नद्या या सह्याद्री पर्वतात मध्ये उगम पावतात .पश्चिम दिशेला जवळच असणाऱ्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कोकणातील सर्व नद्या या अतिशय वेगाने वाहणाऱ्या नद्या आहेत. सह्याद्री पर्वताच्या उंच भागावरून या नद्या उगम पावल्यामुळे सह्याद्री पर्वतापासून समुद्रापर्यंत संपूर्ण परिसर हा डोंगराळ आहे. तीव्र उताराचा असल्यामुळे सर्व नद्या व उपनद्या या अति वेगाने वाहतात. “
वैतरणा नदी
वैतरणा नदी कोकणाच्या पालघर जिल्ह्यामधील महत्त्वाची नदी आहे. ही नदी त्र्यंबकेश्वर येथे ही नदी उगम पावते. त्रंबकेश्वर येथे दोन नद्या उगम पावतात. गोदावरी नदी पूर्वेकडे वाहते. वैतरणा नदी पश्चिमेकडे वाहते. मोडक सागर,नाना शंकरशेठ धरण, अप्पर वैतरणा धरण ही महत्वाची धरणे आहेत. वैतरणा नदीवर मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठीची अतिशय महत्त्वाची धरणे बांधण्यात आली आहेत.वैतरणा नदीची लांबी 154 किलोमीटर आहे. दातीवरे खाडीजवळ वैतरणा नदी अरबी समुद्राला मिळते. वैतरणा कोकणातील अतिशय महत्त्वाची नदी म्हणून ओळखली जाते.वैतरणा नदी कोकणातील सर्वात जास्त लांब नदी आहे.
उल्हास नदी
उल्हास नदी कोकणातील महत्त्वाच्या नद्या पैकी अतिशय महत्त्वाची नदी आहे. कोकणातील मोठमोठी शहरे उल्हास नदीवर वसलेली आहेत.सह्याद्री पर्वतातील लोणावळा या ठिकाणाहून ही नदी उगम पावते.ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर,ठाणे,वसई ही शहरे आणि मुंबईसारखे महा विशाल शहर उल्हास नदी वरील शहर आहे.उल्हास नदी ही मुंबई शहरातूनच अरबी समुद्राला मिळते.मुंबई हे शहर उल्हास नदीच्या मुखाजवळ बेटावर वसलेले आहे.सावित्री नदी,वशिष्ठ नदी,वाघोटान नदी,काजळी नदी,तेरेखोल नदी या कोकणातील उर्वरित महत्त्वाच्या नद्या आहेत.
महाराष्ट्रातील नद्या व उपनद्या-ऑनलाइन टेस्ट
महाराष्ट्रातील नद्या व उपनद्या-ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी वर क्लिक करा.
सराव प्रश्न (१०)
१. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो?
(अ) महाबळेश्वर (ब) त्र्यंबकेश्वर (क) भीमाशंकर (ड) मुलताई
२. पश्चिमवाहिनी असलेली महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रमुख नदी कोणती?
(अ) तापी (ब) कृष्णा (क) भीमा (ड) वैनगंगा
३. पंढरपूरजवळ भीमा नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते?
(अ) कावेरी (ब) चंद्रभागा (क) गंगा (ड) भागीरथी
४. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते?
(अ) नाशिक (ब) लोणावळा (क) महाबळेश्वर (ड) त्र्यंबकेश्वर
५. वैनगंगा आणि वर्धा यांच्या संगमाने कोणती नदी तयार होते?
(अ) पैनगंगा (ब) प्राणहिता (क) इंद्रावती (ड) कन्हान
६. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती?
(अ) उल्हास (ब) सावित्री (क) वैतरणा (ड) तेरेखोल
७. हतनूर धरण कोणत्या नदीवर आहे?
(अ) गोदावरी (ब) तापी (क) कृष्णा (ड) भीमा
८. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?
(अ) गोदावरी (ब) भीमा (क) तापी (ड) वर्धा
९. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
(अ) कृष्णा (ब) नीरा (क) भीमा (ड) गोदावरी
१०. प्रवरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
(अ) कृष्णा (ब) गोदावरी (क) तापी (ड) भीमा
उत्तरे
उत्तरे: १-ब, २-अ, ३-ब, ४-क, ५-ब, ६-क, ७-ब, ८-अ, ९-क, १०-ब
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची माहिती घेण्या साठी येथे क्लिक करा