सराव पेपर-१६ भारताचे राष्ट्रीय प्रतीके
Sarav Bhartache Rashtriy Pratike-सराव पेपर-भारताचे राष्ट्रीय प्रतीके
भारताचे राष्ट्रीय प्रतीके Sarav Bhartache Rashtriy Pratike या भागात आपण भारतातील महत्त्वाच्या 14 राष्ट्रीय प्रतीका विषयी माहिती घेतली आहे.यावर आधारित 25 प्रश्नांचीसराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी सादर करीत आहोत.प्रत्येक प्रश्नाला तीन पर्याय आहेत.सर्वच्या सर्व प्रश्न हे वरील घटकावरच आधारित आहेत.घटकाच्या बाहेर बाहेरील एकही प्रश्न नाही.याच सोबत हीच प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात पाहता येणार आहे.पीडीएफ प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून शकतो.
सराव चाचणी – १६ Sarav Bhartache Rashtriy Pratike
प्र.१ भारताची राजमुद्रा कोणत्या स्तंभावरून घेतली आहे ?
A.सारनाथ येथील अशोक स्तंभावरून B.दिल्ली येथील अशोक स्तंभावरून C.दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून
प्र.२ भारताच्या राजमुद्रेत एकूण किती सिंह आहेत ?
A.तीन B.दोन C.चार
प्र.३. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या पांढऱ्या रंगात कोणते चक्र आहे ?
A.अशोक चक्र B.वीर चक्र C.परमवीर चक्र
प्र.४ राष्ट्रध्वजाच्या लांबी रुंदीचे प्रमाण कसे असते ?
A.3:2 B.3:3 C.4:2
प्र.५. भारताच्या राष्ट्रगीताचे कवी कोण ?
A.सुभाष चंद्र बोस B.रवींद्रनाथ टागोर C.महात्मा गांधी
प्र.६ भारताचे राष्ट्रगीत कोणत्या वर्षी लिहिले आहे ?
A.1911 B.1947 C.1948
प्र.७. राष्ट्रगीत पूर्ण गाण्यासाठी एकूण किती सेकंदाचा वेळ ठरलेला आहे ?
A.50 सेकंद B.52 सेकंद C.60 सेकंद
प्र.८. भारताचे बोधवाक्य कोणते ?
A.सत्यमेव जयते. B.नेहमी सत्याचाच विजय होतो. C.नेहमी खरे बोला.
प्र.९. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
A.वाघ B.सिंह C.चित्ता
प्र.१०. भारताच्या राष्ट्रीय प्राण्याची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली ?
A.1975 B.1972 C.1970
प्र.११. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
A.हरियाल B.मोर C.हंस
प्र.१२. मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून केव्हा मान्यता देण्यात आली ?
A.20 जानेवारी 1963 B.26 जानेवारी 1963 C.20 जानेवारी 2012
प्र.१३. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ?
A.गुलाब B.लीली C.कमळ
प्र.१४. कमळ हे फूल आणखी कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे ?
A.जपान B.व्हिएतनाम C.श्रीलंका
प्र.१५. कमळ कोणत्या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे ?
A.भारतीय जनता पार्टी B.भारतीय कम्युनिस्ट पार्टी C.भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस
प्र.१६. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
A.क्रिकेट B.हॉकि C.फुटबॉल
प्र.१७. हॉकीचे जादूगर कोणाला म्हणतात ?
A.मेजर ध्यानचंद B.मेजर अमरचंद C.मेजर लाला प्रसाद
प्र.१८. राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
A.29 ऑगस्ट B.29 फेब्रुवारी C.29 सप्टेंबर
प्र.१९. भारताची राष्ट्रीय लिपी कोणती आहे ?
A.देवनागरी B.मोडी C.उर्दू
प्र.२०. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?
A.वड B.लिंब C.आंबा
प्र.२१. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?
A.सिताफळ B.आंबा C.नारळ
प्र.२२. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?
A.कासव B.व्हेल मासा C.डॉल्फिन मासा
प्र.२३. भारताचा वारसा प्राणी कोणता ?
A.हत्ती B.उंट C.सिंह
प्र.२४. भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे ?
A.हिंदी B.इंग्रजी C.मराठी
प्र.२५. भारताच्या राष्ट्रभाषेची लिपी कोणती आहे ?
A.देवनागरी B.मोडी C.इंग्रजी
भारताचे स्वाभाविक विभाग आणि त्यांची माहिती व सराव चाचणी पाहण्यासाठी येथे भेट द्या.