शब्दांच्या जाती आणि उपजाती
मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना शब्दांच्या जाती shabdanchya jati aani upjati आणि उपजाती माहीत असणे आवश्यक आहे.अनेक शब्दांचे मिळून वाक्य तयार होते. प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याचे वाक्यातील काम हे वेगळे असते.
- शब्दांच्या आठ जाती किंवा प्रकार
- नाम
- सर्वनाम
- क्रियापद
- विशेषण
- क्रिया विशेषण
- शब्दयोगी अव्यये
- उभयान्वयी अव्यय
- केवलप्रयोगी अव्यये
shabdanchya jati aani upjati-शब्दांच्या जाती आणि उपजाती
Eight types of speech-शब्दांच्या आठ जाती किंवा प्रकार
नाम सर्वनाम क्रियापद विशेषण | क्रिया विशेषण शब्दयोगी अव्यये उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यये |
Noun(shabdanchya jati aani upjati)-नाम
कोणत्याही दिसणाऱ्या किंवा कल्पनेतील सजीव किंवा निर्जीव वस्तूला,व्यक्तीला किंवा त्याच्या गुणधर्माला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात.ज्या शब्दामुळे कोणत्याही वस्तूच्या नावाचा बोध होतो तो शब्द नाम होय.” तो रोज सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करतो. ” या वाक्यात ‘ देवाचे ‘ हे नाम आहे.
नामाचे तीन प्रकार पडतात.
- सामान्य नाम
- विशेष नाम
- भाववाचक नाम
- फुलांची नावे
- फळांची नावे
- पक्ष्यांची नावे
- जंगली प्राण्यांची नावे
- पाळीव प्राण्यांची नावे
- नद्यांची नावे
- पर्वतांची नावे
- वस्तूंची नावे
- मुलींची नावे
- मुलांची नावे
- धान्याची नावे
- ग्रह, नक्षत्र, ताऱ्यांची नावे
- देशांची नावे
- काल्पनिक नावे
- गुणांची नावे
- मनाच्या स्थितीची नावे
- ऋतूंची नावे
- गावांची नावे
- झाडांची नावे
- कीटकांची नावे
- राज्यांची नावे
- जिल्ह्यांची नावे
- डाळींची नावे
- वाराची नावे
- महिन्यांची नावे
- समुद्राची नावे
- धान्याची नावे
- रस्त्याची नावे
Pronoun(shabdanchya jati aani upjati)-सर्वनाम
वाक्यात एकच नाव पुन्हा पुन्हा आले तर हे वाक्य वाचायला रटाळवाने वाटते.वाक्यात गोडवा निर्माण होत नाही.एखाद्या उताऱ्यात किंवा वाक्यात एकाच नामाच्या ऐवजी येणारा दुसरा शब्द म्हणजेच सर्वनाम होय.” नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात “
” राजू,सीमा आणि मी विहिरीत उतरलो.आम्ही मनसोक्त पोहलो.”
या वाक्यात ‘मी,आम्ही’ ही दोन सर्वनामे आहेत.
सर्वनामांचे एकूण सहा प्रकार पडतात.
- पुरुष वाचक सर्वनाम
- प्रथम पुरुषवाचक सर्वनाम-मी,आम्ही,आपण, स्वतः
- द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम-तू, तुम्ही
- तृतीय पुरुषवाचक सर्वनाम -तो,ती,ते,त्या,त्यांना,त्यांची
- दर्शक सर्वनामे-हा,ही,हे,तो,ती,ते
- संबंधी सर्वनामे-जो,जी,जे,ज्या,ज्यांना,ज्यांच्या
- प्रश्नार्थक सर्वनामे-कोण,कोठे,काय,किती,केव्हा,कधी
- अनिश्चित सर्वनामे
- आत्मवाचक सर्वनामे-आपण,स्वतः,आमच्या
Adjective-विशेषण shabdanchya jati aani upjati
एखाद्या वाक्यातील नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या किंवा विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते.एखाद्या वाक्यात एकापेक्षा जास्त नामे आणि एकापेक्षा जास्त विशेषणे असू शकतात.
” बाबांच्या मिशा झुपकेदार आहेत.
आमची मांजर खूपच आळशी आहे.”
या वाक्यात ‘झुपकेदार आणि आळशी’ ही दोन विशेषणे आहेत.
विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात.
- गुण विशेषण-चांगली,गोड,रडत,लाल,तिखट,हिरवा
- संख्या विशेषण
- गुणनावाचक विशेषण-पाच,शंभर,अर्धा,उभय
- क्रमवाचक विशेषण-दुसरा,तिसरा,पहिला,शेवटचा,साठावे
- आवृत्तीवाचक विशेषण-पाच,पट,दसपट,तिप्पट,द्विगुणित
- पृथक्त्ववाचक विशेषण-एकेक,दोहोंची,दहदहा
- अनिश्चित संख्यावाचक विशेषण-काही,थोडे,सर्व,खूप,इतर
- सार्वनामिक विशेषण-आम्ही,त्यांची,तिची
Verb-क्रियापद
वाक्यामधील क्रिया दर्शविणाऱ्या आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. काही वाक्यात क्रियापद हे शेवटी असते तर काही वाक्यात क्रियापद हे सुरुवातीलाच असते.
१. नियमित काम केल्याने यश मिळते.
२. सापडला माझा पेन .
वरील पहिल्या वाक्यात क्रियापद हे वाक्याच्या शेवटी आहे .. तर दुसऱ्या वाक्यात क्रियापद सुरुवातीलाच आहे.
क्रियापदाचे एकूण आठ प्रकार आहे .
- अकर्मक क्रियापद २.सकर्मक क्रियापद 3.उभयविध क्रियापद 4.दविकर्मक क्रियापद 5.संयुक्त क्रियापद 6.भावकर्तुत्व क्रियापद 7.प्रयोजक क्रियापद 8. शक्य क्रियापद.
Adverb-क्रियाविशेषण
क्रियापदाची विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात .
क्रियाविशेषनाचे एकूण चार प्रकार पडतात .
- काळवाचक क्रियाविशेषण
- कालदर्शक क्रियाविशेषण-आता,आधी, हल्ली, दरअसलद्या,परवा पूर्वी.
- सातत्य दर्शक क्रियाविशेषण-नित्य,सदा, सर्वदा,सतत,नेहमी,आजकाल.
- आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण-वारंवार,फिरून,पुन्हा पुन्हा,दररोज.
- स्थलवाचक क्रियाविशेषण
- स्थितिदर्शक क्रियाविशेषण-खाली,वर, यथे,जेथे,पलीकडे,अलीकडे,जिकडे,तिकडे,चोहीकडे.
- गती दर्शक क्रियाविशेषण-इकडून, तिकडून,दूर,पुढून,मागून,वरून.
- रितीवाचक क्रियाविशेषण
- प्रकारदर्शक क्रियाविशेषण-असे,कसे,उगीच, फुकट,आपोआप,मुद्दाम,हळू,सावकाश,जलद
- अणुकरन दर्शक क्रियाविशेषण-झटकन,पटकन,टपटप,बदाबद
- निश्चय दर्शक क्रियाविशेषण-खरोखर,खचित
- परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण किंचित,जरा,थोडासा,क्वचित,अगदी,थोडेसे, बिलकुल,मुळीच,भरपूर,मोजके,पूर्ण .
Prepositions-शब्दयोगी अव्यये
वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात अशा शब्दांना शब्दयोगी अव्यये म्हणतात .
शब्दयोगी अव्यये सोळा प्रकारची आहेत.
- कालवाचक-पूर्वी, पुढे, आधी, नंतर,मागे, पर्यन्त, खालून, मागून, पुढून, पासून.
- स्थलवाचक-आत,बाहेर,मागे, पुढे,मध्ये,अलीकडे, जवळ, ठायी.
- करणवाचक-मुले, योगे,करून, कडून,द्वारा,करवी, हाती.
- हेतुवाचक-साठी, कारणे,करिता,प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव.
- व्यक्ति रेखा वाचक-शिवाय,खेरीज,विना,वाचून,व्यतिरिक्त.
- तुलनावाचक-पेक्षा,तर,तम, मध्ये, परिस.
- योग्यता वाचक-योग्य,समान,सारखा,समान, सम,प्रमाणे.
- कैवल्यवाचक-मात्र,ना,पान, फक्त, केवळ.
- संग्रहवाचक-सुध्दा,देखील, ही, पान, बरीच,केवळ, फक्त.
- संबंधवाचक-विषयी, विशी.
- साहचर्य वाचक-बरोबर,सह,संगे,सकट,सहीत, सवे, निशी, समवेत.
- भागवाचक-पैकी, पोती, आतून.
- विनिमय वाचन-बद्दल, ऐवजी,जागी,बदली.
- दिकवाचक-प्रत , प्रती, कडे, लागी.
- विरोधावाचक-विरुद्ध,विन,उलटे,उलट.
- परीनामवाचक-भर ,
Amphibious-उभयान्वयी अव्यये
दोन किंवा अधिक शब्द वा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यये म्हणतात.
उभयान्वयी अव्यये दोन प्रमुख प्रकारची आहेत.
- प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यये –
- समुच्च बोधक-व,अन् , शिवाय
- विकल्प बोधक-अथवा,वा,कि,किंवा,
- न्यूनव्य बोधक-पण,परंतु,पारी,बाकी
- परिणाम बोधक-सबब, यास्तव,याकरिता
- गौणत्व दर्शक –
- स्वरूप बोधक-म्हणजे, कि, म्हणून
- कारण बोधक-कारण, का, की
- उद्देश बोधक-यास्तव,म्हणून
- संकेत बोधक-जर, तर,जारी, तरी
Interjection-केवळप्रयोगी अव्यये
अचानक पणे मनात निर्माण झालेल्या भावना, दुख:,आश्चर्य,किंवा आणखी काही भाव व्यक्त करणाऱ्या शब्दाला केवळप्रयोगी अव्यये म्हणतात.
केवळप्रयोगी अव्यये दोन प्रकारची असतात .
- उद्गारवाची अव्यये –
- हर्ष किंवा आनंद दर्शक-आहा,अहाहा,वा,वावा,ओहो
- शोक दर्शक-अरेरे,आईग, हाय हाय, अँ ,
- आश्चर्य दर्शक-ओहो,अबब, बापरे,अहाहा,चकचक,अरेच्या, ऑं
- प्रशंसा दर्शक-छान,ठीक,शाबास,वाहवा,फक्कड
- संमती दर्शक-ठीक,हां,जीहां,अच्छा,
- विरोध दर्शक-छे,छट,हॅट,उहू,
- तिरस्कार दर्शक-फूस,छी,शीड, हुड, थू ,
- संबोधन दर्शक-अरे,अहो,अगा, अग, ए,
- मौन दर्शक-चूप,चिप,गप,गुपचिप
- व्यर्थ उद्गार वाची अव्यये
- पादपूरणार्थ केवळप्रयोगी अव्यये
मराठी भाषेतील म्हणी आणि त्यांचे अर्थ जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
हे वाचा- ३५० समान अर्थाचे शब्द माहिती करून घ्या.