समाजसुधारक आणि त्यांचे कार्य
महाराष्ट्रातील समाजसुधारक-महाराष्ट्रातील ११ समाज सुधारक आणि त्यांचे कार्ये
महाराष्ट्राला अनेक महान समाज सुधारकांची महाराष्ट्रातील समाजसुधारक परंपरा आहे.शेकडो वर्ष महाराष्ट्र आणि संपूर्ण देश अतिशय समाज विघातक अशा रूढी परंपरांनी ग्रासून गेला होता.त्यानंतर इंग्रजांचे राज्य या प्रदेशावर प्रस्थापित झाले.या भारतीय समाज व्यवस्थेला रूढी परंपरांनी जखडून टाकले होते.महाराष्ट्रात अनेक समाजसुधारक होऊन गेले. त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले.समाजाला नवी दिशा देण्याचे महान कार्य केलेल्या महाराष्ट्रातील समजसुधारकांचा आणि त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा खाली घेण्यात आला आहे.
Mahatma Fule महाराष्ट्रातील समाजसुधारक-महात्मा ज्योतिबा फुले
- महात्मा फुले हे महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसुधारक होते.
- जन्म-महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी गाव कटगुण,सातारा येथे झाला.
- लग्न-सन 1840 साली सावित्रीबाईशी लग्न.
- सामाजिक कार्य-भारतीय समाजातील सामाजिक विषमता दूर करणे,स्त्री शिक्षण,मुला मुलींचे शिक्षण यावर भर.विधवा विवाह मदत,बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना.
- 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा काढली .
- सामाजिक पुनर्रचनेसाठीची चळवळ सुरू करण्यासाठी ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना 24.09.1873 मध्ये केली .
- नारायण मेघाजी लोखंडे यांच्या मदतीने भारतातील पहिली कामगार संघटना “बॉम्बे मिल हँड असोसिएशन” या नावाने 1880 साली स्थापन केली.
- वेद,ब्राम्हण्य,मनुस्मृती यांना कडाडून विरोध केला.
- 11 मे 1888 मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेकडून महात्मा ही पदवी प्रदान.
- 28 नोव्हेंबर 1890 पुणे येथे निधन.
- महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे “मार्टिन ल्युथर किंग” म्हणून ओळखले जातात.
- शेतकऱ्याचा आसूड,शिवाजीचा पोवाडा,सार्वजनिक सत्यधर्म,अखंड,गुलामगिरी,अस्पृश्यांची कैफियत,दीनबंधु साप्ताहिक,तृतीय रत्न,ब्राह्मणांचे कसब,इशारा अशा अनेक पुस्तकांचे लेखन केले.
Rajarshi Shahu Maharaj महाराष्ट्रातील समाजसुधारक-राजर्षी शाहू महाराज
- राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाडगे असे होते.त्यांचा जन्म कागल जिल्हा नाशिक येथे 26.06.1874 रोजी झाला.
- कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी यशवंत यांना 17 मार्च 1884 साली दत्तक म्हणून स्वीकारले.त्यांचे शाहू असे नाव ठेवण्यात आले.
- शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2 एप्रिल 1894 त्यांनी कोल्हापूरचे अधिपती म्हणून पदभार स्वीकारला.
- सामाजिक कार्य-स्त्री शिक्षण,अस्पृश्यता निर्मूलन,विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता,आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता, बहुजन समाजाचे शिक्षण,सत्यशोधक चळवळीचा प्रसार,आरक्षणाचे जनक.
- 1902-मध्ये कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के आरक्षनाची घोषणा केली .
- 1912-प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदा केला.या कायद्याद्वारे प्रत्येक लहान मुलाला शिक्षण घेणे सक्तीचे होते.
- 1916-डेक्कन रयत असोसिएशन या संस्थेची स्थापना केली.
- 1917-विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा तयार केला.
- 1818-आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा तयार केला.
- 1919-सवर्ण व अस्पृश्य यांच्यासाठी वेगवेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.
- सर्व समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे म्हणून 26 वेगवेगळ्या जातीच्या वस्तीगृहाची निर्मिती केली.
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी मदत केली.
- अनेक ठिकानी अस्पृश्यता परिषद घेऊन अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले.
- कोल्हापूर संस्थानात संगीत,चित्रपट, चित्रकला,लोक कला,कुस्ती,वन्यजीव संरक्षण,शेती,कारखाने,धरण बांधकाम अशा अनेक क्षेत्रात भरीव काम केले.
- उत्तर भारतातील कुर्मी समाजाने कानपूर येथे 1919 मध्ये “राजर्षी” ही पदवी बहाल केली .
- भारतातील सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि महान समाजसुधारक म्हणून ओळखले जातात.
- 6 मे 1922 साली मुंबई येथे निधन झाले .
Dr.Ambedkar महाराष्ट्रातील समाजसुधारक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान समाज सुधारक,भारताचे घटनाकार,अर्थशास्त्रज्ञ,समाजशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ होते.
- पूर्ण नाव–डॉ.भीमराव रामजी आंबेडकर
- जन्म-14 एप्रिल 1891 महू गाव मध्य प्रदेश
- शिक्षण-एम.ए,पी.एचडी,एम.एस्सी, डी.एससी, बार ॲट लॉ या पदव्या बाबासाहेबांनी संपादित केल्या.
- 07.11.1900 – साताऱ्याच्या सरकारी शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यात आला.
- 1904-चौथी पास होऊन एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्यात आला.
- 1907-मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.
- 03.01.1908-मुंबई विद्यापीठात बीए साठी प्रवेश घेण्यात आला.
- 1913-मुंबई विद्यापीठ येथून बीए ही पदवी राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयात प्राप्त केली.अस्पृश्य वर्गातून बी.ए ही पदवी मिळवणारे पहिले विद्यार्थी होते.
- 1915-न्यूयॉर्क,अमेरिका येथील कोलंबिया विद्यापीठ येथून एम.ए ही पदवी-अर्थशास्त्र, समाजशास्त्र,इतिहास,राज्यशास्त्र,मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयात अभ्यास केला.एम.ए या पदवीसाठी त्यांनी “प्राचीन भारतीय व्यापार ” या विषयावर प्रबंध सादर केला.
- 1917-पीएचडी (कोलंबिया विद्यापीठ) साठी त्यांनी “ भारताचा राष्ट्रीय लाभांश इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन” हा प्रबंध लिहिला व पीएचडी प्राप्त केली. या शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड यांनी आर्थिक मदत केली.
- 1916-लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स,लंडन येथे एम.एससी ही पदवी प्राप्त केली.
बाबासाहेबांचे सामाजिक आणि राजकीय कार्ये
- अर्थशास्त्रात पीएचडी मिळवणारे पहिले भारतीय विद्यार्थी.
- राजकीय पक्ष-बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष,शेड्युल कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्ष स्थापन केले.
- सामाजिक संस्था-बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभा,समता सैनिक दल या सामाजिक संस्था स्थापन केल्या.
- 1919-मूकनायक पाक्षिकाची सुरुवात करण्यात आली.
- 05.07.1923-मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली.
- 10.06.1925 ते 31.03.1928 पर्यंत बॉटली बॉईज अकाउंटन्सी इन्स्टिट्यूट येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली.
- 20.07.1924-बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली.
- 20.03.1927-महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला.
- 03.04.1927-बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरु केले.
- 25.12.1927-मनुस्मृतीचे दहन महाड येथे करण्यात आले.
- 03.03.1930-नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह सुरू.
- 24.09.1932-पुणे करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
- 26.05.1935-पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.
- 13.10.1935-येवला जि.नाशिक येथे हिंदू धर्मांतराची घोषणा करण्यात आली.
- 1936-स्वतंत्र मजूर पक्ष या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली.
- 18.07.1942-नागपूर येथे “ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन ” या संघटनेची स्थापना करण्यात आली.
- 20.06.1945-मुंबईतील पीपल्स एज्युकेशन सोसायटी तर्फे चालवल्या जाणाऱ्या सिद्धार्थ महाविद्यालया ची स्थापना करण्यात आली.
- 1946-पश्चिम बंगाल मधून घटना समितीवर निवडून गेले.
- 29.08.1947-स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे लेखन करण्यासाठी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
- 1.09.1950-औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. भारताचे राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या शुभहस्ते कोनशिला बसवण्यात आली.
- 1951-बौद्ध महासभेची स्थापना करण्यात आली.बौद्ध महासभा धार्मिक क्षेत्रात काम करते.बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार सभेमार्फत केले जाते.
- 20.09.1951-भारताच्या मंत्रिमंडळातील कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.
- मे-1956-प्रबुद्ध भारत साप्ताहिक सुरु केले.
- 14.10.1956-नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व इतरांनाही दीक्षा दिली.
- 06.12.1956-नवी दिल्ली,अलीपुर रोड येथील निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले.
- बुद्ध अँड हिज धम्म,थॉट्स ऑन पाकिस्तान, हू वेअर शुद्रास,कास्ट इन इंडिया,द अंटचेबल्स, रिडल्स इन हिंदूझम हे ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिले.
Karmvir Bhaurao Patil-कर्मवीर भाऊराव पाटील
- कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22.09.1887 कुंभोज जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र येथे जैन समाजात झाला.
- मागासवर्गीय आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कमवा आणि शिका ही योजना सुरू केली.
- 04.10.1919-गोरगरीब आणि मागासवर्गीय यांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्था आपण केली.रयत शिक्षण संस्था ही आज आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे.
- 1932-यूनियन बोर्डिंगची स्थापना करण्यात आली.
- 1935-महात्मा फुले अध्यापक विद्यालयाची स्थापना केली.
- 1959-सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला.
- 09.05.1959-कर्मवीर भाऊराव पाटील यांचे देहावसान झाले.
- म. गांधी यांनी कर्मवीर ही पदवी बहाल केली.
Vitthal Ramji Shinde-महर्षी विठ्ठल रामजी शिंदे.
- 02.04.1873-कर्नाटक राज्यातील जामसिंडी या गावी विठ्ठल रामजी शिंदे यांचा झाला.
- 18.10.1906-अस्पृश्यांच्या कल्याणासाठी डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना मुंबई येथे केली.
- 1917-राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता येथे झालेल्या अधिवेशनात अस्पृश्यता निर्मूलन विषयी ठराव पास करून घेतला.
- देवदासी प्रथा,मुरळी प्रथा कायमची बंद करावी यासाठी आंदोलन सुरु केले.
- सहकारी रावजी भोसले यांच्या मदतीने पंढरपुरात अनाथ आश्रम सुरू केला.
- अहिल्याबाई आश्रमाची स्थापना पुण्यात केली.
- राष्ट्रीय मराठा महासंघाची स्थापना करण्यात आली.
- 1928-पहिली शेतकरी परिषद पुणे येथे भरवण्यात आली. शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा करणे,शेतकऱ्याला संघटित करणे ही उद्दिष्टे ठेवण्यात आली होती.
- अस्पृश्यतेचा प्रश्न,बहिष्कृत भारत,अनटचेबल इंडिया,माझ्या आठवणी व माझे अनुभव इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिली आहेत.
- 02.04.1944-महर्षी विठ्ठल शिंदे निधन झाले.
Gopal Ganesh Aagarkar-गोपाळ गणेश आगरकर
- 14.70.1856-गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म टेंभू सातारा येथे झाला.
- 1880-गोपाळ गणेश आगरकर,लोकमान्य टिळक व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुण्यात केली.
- 1881-लोकमान्य टिळक व आगरकर यांनी मिळून मराठा व केसरी हे वृत्तपत्र चालू केले.
- 1884-लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
- 1888- केसरी वृत्तपत्राच्या संपादकपदाचा राजीनामा देऊन सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले.
- सुधारणावादी विचारसरणी न पटल्यामुळे पुण्यातील लोकांनी जिवंतपणी प्रेतयात्रा काढली.
- डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, विकार विलसित हॅम्लेट चे भाषांतर ही पुस्तके त्यांनी लिहिली.
- 17.06.1895-निधन
JaggaNath Shankar Seth-जगन्नाथ शंकर शेट
- 10.02.1803-जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म मुरबाड ठाणे येथे झाला.
- 1822-बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
- 1848-आपल्या स्वतःच्या घरात मुलाकरिता मुंबईतील पहिली शाळा सुरू केली.
- 1852-बॉम्बे असोसिएशन या नावाने पहिल्या राजकीय संघटनेची मुंबई येथे स्थापना केली.
- 1829-बंगाल प्रांतात लागू असलेला सतीप्रथा बंदीचा कायदा मुंबई प्रांतातही लागू करावा यासाठी प्रयत्न केले.
- 1830-मुंबई प्रांतात सतीप्रथा बंदीचा कायदा लागू करण्यात आला.
- ग्रंड झुरी मध्ये हे स्थान मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरले.
- 1835-अंश सरकारने मुंबईचे जस्टिस ऑफ पीस म्हणून त्यांची नियुक्ती केली.
- मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य होण्याचा पहिला मान त्यांना मिळाला.
- 1865-जगन्नाथ शंकर शेठ यांचा मृत्यू.
Balshastri Jambhekar-बाळशास्त्री जांभेकर
- 06.01.1812-पोंभुर्ले तालुका देवगड येथे बाळ शास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर त्यांचा जन्म झाला .
- 06.01.1832-मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक तर्पण दर्पण सुरू केले म्हणून त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात.
- 1840-मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू केले. या कामी त्यांना भाऊ दाजी लाड दादाभाई नवरोजी विद्यार्थी असताना मदत करत होते.
- बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी या ग्रंथालयाची स्थापना केली.
- दर वर्षी 06 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
- 17.05.1846-मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
Dhondo Keshav Karve-महर्षी धोंडो केशव कर्वे
- 18.04.1858-धोंडो केशव कर्वे यांचा जन्म शेरवली मुरुड या ठिकाणी झाला
- 1893-विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना केली.
- 1893-पहिल्या पत्नीच्या निधनानंतर गोदाबाई नावाच्या विधवेशी लग्न केले.
- 1896-पुण्याजवळील हिंगणे येथे विधवा महिला साठी आश्रम स्थापन करण्यात आला.
- 1907-महिला विद्यालयाची स्थापना.
- 1910-निष्काम कर्म मठाची स्थापना करण्यात आली.आश्रम आणि शाळा या दोन्ही साठी लागणारे मनुष्यबळ विकसित व्हावे यासाठी या मठाची स्थापना करण्यात आली.
- 1916-पुणे येथे पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.कालांतराने या विद्यापीठाचे नामकरण श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असे बदलण्यात आले. (SNDT)
- 1958-या महान समाज सुधारकाने केलेल्या कार्याबद्दल त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्यात आला.
Pandita Ramabai-पंडिता रमाबाई
- 23.04.1858-पंडिता रमाबाई जन्म
- 1881-स्त्रीयांच्या सुधारणा विषयी कार्य करण्यासाठीपुणे येथे आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना केली.
- 1889-अनाथ आणि विधवा स्त्रिया यांच्या राहणे जेवण आणि शिक्षणाच्या मोफत व्यवस्था करण्यासाठी मुंबई येथे शारदा सदन नावाची संस्था आणि पुणे येथे मुक्ती सदन या नावाने स्वतंत्र वसाहत स्थापन केली.
- हिब्रू भाषेवरून बायबल या ग्रंथाचे मराठी भाषेत रूपांतर त्यांनी केले.
- 1919-ब्रिटिश सरकारने त्यांनी महान कार्य केल्याचा गौरव म्हणून कैसर इ हिंद हा पुरस्कार देऊन देऊन गौरव केला.
- 05.04.1922-पंडिता रमाबाई यांचे निधन झाले.
- स्त्रीधर्म नीती,हाय कास्ट हिंदू वुमन,अमेरिकेचा प्रवास ही पुस्तके त्यांनी लिहिली.
Savitribai Fule Social Reformer in Maharashtra-सावित्रीबाई फुले
- या महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसुधारक होऊन गेल्या आहेत.
- 03.01.1831-नायगाव,तालुका-खंडाळा, जिल्हा-सातारा येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला.
- 1840-ज्योतीरावांशी विवाह.
- 1841-ज्योतिराव फुले फुले यांच्या प्रेरणेने शिक्षणाला सुरुवात.
- 01.01.1848-ज्योतिरावांनी सुरू केलेल्या मुळीसाठीच्या पहिल्या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षीका व पहिल्या मुख्याध्यापिका.
- भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली.
- 1893-सासवड पुणे येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.
- 10.03.1897- पुण्यामध्ये प्लेगच्या साथीच्या प्लेग रुग्णाच्या सेवा करत असताना प्लेगची लागण होऊन त्यांचे निधन झाले.
- काव्यफुले,सुबोध रत्नाकर दोन कविता संग्रह त्यांनी लिहिले.
भारतातील प्रथम व्यक्ति विशेष जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.