कोन आणि कोनाचे प्रकार

Types of Angles Konache Prakar

What is angles ? कोन म्हणजे काय ?

कोणतीही आकृती तयार होण्यासाठी बाजू म्हणजे भुजा याची गरज असते. बाजू शिवाय आकृती वा कोन Types of Angles तयार होत नाही.

दोन बाजू किंवा दोन भुजा यांची कोणत्याही एका बिंदू मध्ये स्पर्श होत असेल तिथे कोन angles तयार होतो. दोन बाजू जेव्हा एकमेकाला छेदतात तिथे कोन तयार होतो. खालील आकृतीवरून आपल्या लक्षात येईल

बाजू AB आणि बाजू LM या दोन बाजू आहेत.बाजू AB च्या A बिंदूजवळ एकमेकींना स्पर्श झाल्या आहेत. त्या ठिकाणी जो एक नवीन आकृतीचा भाग तयार झाला आहे त्यास कोन angle असे समजले जाते.दुसऱ्याआकृतीतबाजू KLआणि बाजू PQ या बाजू KLच्या मधल्या भागात छेदल्या गेल्या आहेत. तेथे एकापेक्षा जास्त कोन तयार झाले आहे.

म्हणजेच जेव्हा दोन बाजू एकमेकींना छेदतात किंवा शेवटच्या बिंदू जवळ एकत्र येतात त्या ठिकाणी कोन तयार होतो.

Use of Protractor-कोनमापक आणि त्याचा वापर Types of Angles

AnglesAnglesअर्ध गोलाकार असलेल्या कोन मापकाचा वापर हा कोनाचे माप मोजण्यासाठी केला जातो. AnglesAnglesकोनमापकाच्या खालील सरळ बाजूस असलेल्या रेषेवरील मधल्या बिंदूला कोनाच्या बिंदू जवळ ठेवून कोन मोजला जातो.

कोनाचे माप नेहमी अंशात लिहिले जाते. कोनाचे माप कसे घ्यावे हे खालील आकृतीवरून स्पष्ट होईल.

Angles

कोणाचे मुख्य तीन प्रकार आहेत.Types of Angles

कोन मापकाच्या सहाय्याने जेव्हा एखादा कोन मोजला जातो.ज्यावेळी त्या कोनाचे माप 90 अंश एवढे असते.

तेव्हा तो कोन काटकोन म्हणून ओळखला जातो.काटकोनात एक बाजू सरळ आडवी तर दुसरी बाजू सरळ उभी असते.

खालील आकृतीवरून काटकोन ओळखायला मदत होईल.काटकोनाच्या सोबतचा कोन नेहमी काटकोनच असतो.

Angles

Acute Angle-लघुकोन

कोन मापकाच्या साह्याने कोनाच्या कोणत्याही एका बाजूवर कोन मापक ठेवून कोन मोजला असता.त्या कोनाचे माप जर 90° पेक्षा कमी असेल तर तो कोन लघुकोन म्हणून ओळखला जातो. खालील आकृतीवरून लघुकोन स्पष्ट होईल.

 

लघुकोना शेजारील कोन नेहमी विशाल कोनच असतो.लघुकोन व त्या शेजारील विशाल कोण ह्या दोघांचे माप एकूण 180 अंश एवढेच असते.

 

Obtuse Angle-विशाल कोन

कोन मापकाच्या साह्याने, कोनाच्या कोणत्याही एका बाजूवर कोनमापक घेऊन कोन मोजला असता,ज्याचे माप 90° पेक्षा जास्त असते तो कोन विशाल कोन म्हणून ओळखला जातो.

शेजारील आकृतीवरून विशाल कोन आणखी स्पष्ट होईल.

विशाल कोनाच्या शेजारील कोन नेहमी हा लघु कोन असतो.

विशाल कोन आणि शेजारील लघुकोन या दोघांच्या मापाची बेरीज ही नेहमी 180 अंश एवढीच असते.

मराठी व्याकरणातील काळ त्यांचे प्रकार समजून घ्या.

Similar Posts

2 Comments

  1. खुपच छान आणि सोप्या शब्दांमध्ये समजेल अशी माहिती आहे त्यासोबतच कोन व कोनाचे प्रकार ही संकल्पना स्पष्ट होण्यास हा लेख अतिशय महत्त्वपूर्ण वाटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *