महाराष्ट्रातील विद्यापीठे
Universities in Maharashtra-महाराष्ट्रातील विद्यापीठे
महाराष्ट्र राज्यात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक विद्यापीठांची-Universities in Maharashtra निर्मिती करण्यात आली.त्या त्या भागात उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी हा त्याचा उद्देश होता.
List of Universities in Maharashtra-महाराष्ट्रातील विद्यापीठे
मुंबई विद्यापीठ-मुंबई
भारतातील प्रमुख शहर आणि आर्थिक राजधानी मुंबई हे शहरआहे.महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 रोजी करण्यात आली. मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू जॉन विल्सन हे होते.मुंबई विद्यापीठाचे नाव 1996 पर्यंत बॉम्बे विद्यापीठ किंवा युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे असे होते.4 सप्टेंबर 1996 रोजी बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई करण्यात आले त्यानुसार बॉम्बे विद्यापीठाचे नाव मुंबई विद्यापीठ असे करण्यात आले.आपल्या देशातील विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठ हे सर्वात जुने विद्यापीठ आहे.
“शील वृत्त फला विद्या” म्हणजेच विद्येचे फळ म्हणजे चांगले शील होय.हे मुंबई विद्यापीठाचे ब्रीद वाक्य आहे.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ-मुंबई-Universities in Maharashtra
श्रीमती.नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई या विद्यापीठाची स्थापना प्रसिद्ध समाजसेवक धोंडो केशव कर्वे यांनी केली.03 जून 1916 रोजी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.विद्यापीठ विद्यापीठाचे सुरुवातीचे नाव “भारत वर्षीय महिला विद्यापीठ”असे होते.1920 साली या विद्यापीठाचे नाव बदलून पंधरा लाख रुपये देणगी दिलेल्या श्री.विठ्ठलदास ठाकरसी यांच्या आईचे नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांचे नाव देण्यात आले. पुढे 1951 साली या विद्यापीठाला महाराष्ट्र सरकारची मान्यता देण्यात आली.
हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे.याच विद्यापीठाला एस.एन.डी.टी.विद्यापीठ असेही म्हणतात.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे -Universities in Maharashtra
मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना 10 फेब्रुवारी 1949 रोजी करण्यात आली. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू मुकुंद रामराव जयकर हे होते.07 जून 2014 रोजी पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे असे करण्यात आले.पुणे शहराला सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा लाभलेला आहे. य : क्रियावान स पंडित : हे विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.पुणे शहराला विद्येचे माहेर असे संबोधले जाते.भारतभरातून लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ-औरंगाबाद-Universities in Maharashtra
मराठवाडा विद्यापीठ या जुन्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील औरंगाबाद शहरात हे विद्यापीठ सन 23.08.1958 साली स्थापन करण्यात आले. महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेच्या मागणीनुसार विद्यापीठाचे नामकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे 14 जानेवारी 1994 रोजी करण्यात आले. त्याच सोबत नांदेड शहरात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची सुद्धा सुरुवात करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू एस.आर.डोंगरेकरी हे होते.’ हे ज्ञानी ची पवित्रता|ज्ञानीची आथी|’ या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड-Universities in Maharashtra
मराठवाड्याचे सुपुत्र आणि मराठवाड्याला निजामाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्राणाची बाजी लावणारे रामानंद तीर्थ यांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे मराठवाड्यातील दुसरे विद्यापीठ होय.या विद्यापीठाची स्थापना 17.09.1994 रोजी नांदेड या ठिकाणी करण्यात आली.मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करून या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली .
राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठ,नागपूर -Universities in Maharashtra
नागपूर हे भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे.महाराष्ट्राच्या उपराजधानीचे ठिकाण असलेल्या नागपूर शहरात संत तुकडोजी महाराज विद्यापीठ स्थापन झाले.या विद्यापीठाची स्थापना सन 04.08.1923 साली करण्यात आली. पहिल्या कुलगुरुपदाचा बहुमान सर बिपीन कृष्ण बोस यांना प्राप्त झाला.
सन 2005 साली या विद्यापीठाचे नामांतर करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ असे करण्यात आले. “ विद्या परमदैवत “ म्हणजे विद्या ही परम देवता आहे,असे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.
कालिदास संस्कृत विद्यापीठ–नागपूर
नागपूर येथील रामटेक येथे कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना 18.09.1997रोजी करण्यात आली. संस्कृत भाषेच्या अभ्यासाला चालना मिळावी यासाठी हे विद्यापीठ स्थापन करण्यात आले. डॉ.पंकज चांडे (Dr.Pankaj Chande ) हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. “ राष्ट्रहिताय संस्कृतम्” हे या विद्यापीठाचे या ब्रीदवाक्य आहे.
पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर
महाराष्ट्रातील पशू आणि मासे यांचा अभ्यास आणि संशोधन होणे गरजेचे आहे. म्हणून विद्यापीठाची स्थापना 17नोव्हेंबर 2000 नागपूर ठिकाणी करण्यात आली. “पशुमत्स्यधनम् नित्य सर्व लोकोपकारकम शोध शिक्षणजन् कार्य ज्ञानकौशल्यदायकम” हे या विद्यापीठाचे ब्रीद वाक्य आहे.
राष्ट्रसंत गाडगे महाराज विद्यापीठ,अमरावती
अमरावती शहर हे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पवित्र स्मृतीने पावन झाले आहे. तात्कालीन नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून 01 मे 1983 रोजी अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.काही कालावधीनंतर थोर संत समाज सुधारक गाडगे महाराज यांचे नाव या विद्यापीठास देण्यात आले. “Education for Savation of Soul” हे विद्यापीठाचे ब्रीद वाक्य आहे.
गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली
महाराष्ट्राच्या आदिवासीबहुल असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या ठिकाणी 27.09.2011 रोजी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून या विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली.”ज्ञानदेव तू कैवल्यम” विद्यापीठाचे ब्रीद वाक्य आहे.“विद्यापीठाचे पहिले कुलगुरू विजय आईंचवार हे होते.
शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाची स्थापना 18 नोव्हेंबर 1962 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख कोल्हापूर शहरात करण्यात आली. गोरगरीब आणि तळागाळातील विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाची गंगा प्रस्थापित व्हावी या उद्देशाने विद्यापीठ स्थापन करण्यात आले.
या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार हे होते.“ ज्ञानमेवामृतम् “ हे विद्यापीठा चे ब्रीदवाक्य आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर
पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना 1ऑगस्ट 2004 रोजी करण्यात आली.विद्यापीठाचे मूळ नाव सोलापूर विद्यापीठ असे होते. विद्यापीठाचे जुने नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले.”विद्या संपन्नता”हे विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाचे विभाजन करून सोलापूर विद्यापीठ बनवण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ,नाशिक
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना 1 जुलै 1989 नाशिक या ठिकाणी करण्यात आली.या विद्यापीठाची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे.डॉ.राम ताकवले हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. “ ज्ञानगंगा घरोघरी “ हे या विद्यापीठाचे ब्रीद वाक्य आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक
आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना नाशिक या ठिकाणी 03.06.1998 साली करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि निमवैद्यकीय महाविद्यालय या विद्यापीठाच्या अंतर्गत कार्य करतात.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या आधीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाची स्थापना जळगाव शहरात 15.08.1990 साली करण्यात आली.
आधीचे नाव बदलून विद्यापीठाला वर्हाडातील प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले.”अंतरी पेटवू ज्ञानज्योत”हे या विद्यापीठाचे ब्रीद वाक्य आहे.कवयित्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. एन.के.ठाकरे हे होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ,लोणेरे जि.रायगड.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना 05मे 1989 रोजी लोणेरे तालुका माणगाव जिल्हा रायगड या ठिकाणी करण्यात आली.
Agri Universities in Maharashtra-महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी जि-अहमदनगर.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना 29 मार्च 1968 राहुरी अहमदनगर येथे
करण्यात आली.“अन्न बहु कुर्वीत तद व्रतम् ” विद्यापीठाचे ब्रीद वाक्य आहे.
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली जि-रत्नागिरी.
कोकण विभागातील शेती औद्योगीकरण व शेतकरी सक्षमीकरणाचे ध्येय समोरठेवले गेले.कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे 18.05.1972 साली करण्यात आली.
कोकण कृषी विद्यापीठाचे नामकरण डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असे 12.02.2001 साली करण्यात आले.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे तत्कालीन वसंतराव नाईक सरकारने 20 ऑक्टोबर 1969 रोजी केली.
विदर्भातील कृषी औद्योगीकरण व शेतकरी सक्षमीकरणाचे ध्येय समोर ठेवून या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी.
मराठवाडा या विभागात 18 मे 1972 रोजी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव या विद्यापीठास देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्वात प्रथम व्यक्ति,ठिकाण याविषयी माहिती जाणून घ्या