शब्द समुहाबद्दल एक शब्द
मराठी भाषेत बोलताना अनेक वेळा शब्द समूहाचा शब्द समुहाबद्दल एक शब्द-word about a phrase वापर करावा लागतो.
वेळी भला मोठा शब्दसमूह वापरणे संयुक्तिक होत नाही.
त्या ऐवजी शब्द समुहाबद्दल एक शब्द वापरला तर भाषा अधिक समृद्ध वाटते. ते वाक्य ऐकणारालासुद्धा ऐकायला चांगले वाटते.
कमी शब्दात आपले म्हणणे मांडणे कधीही प्रभावशाली असते. नेहमी शब्द समुहाबद्दल एक शब्द वापरला पाहिजे.
अनेकदा शब्दसमूह वापरल्याने ते वाक्य खूपच लांब होते,
समजण्यास अवघड वाटते. त्याऐवजी शब्द समुहाबद्दल एक शब्द वापरुन आपण वाक्याची लांबी कमी करू शकतो.
शब्द समुहाबद्दल एक शब्द वापरल्याने वाक्याचा अर्थ अजिबात बदलत नाही.
- भाग-1 शब्दसमुह आणि शब्द समुहाबद्दल एक शब्द
- भाग-2 शब्दसमुह आणि शब्द समुहाबद्दल एक शब्द
- भाग-3 शब्दसमुह आणि शब्द समुहाबद्दल एक शब्द
- भाग-4 शब्दसमुह आणि शब्द समुहाबद्दल एक शब्द
Shabd Samuhabaddal Ek Shabd-शब्द समुहाबद्दल एक शब्द
Shabd Samuhabaddal Ek Shabd part-one
अरण्याचा किंवा वनाचा राजा | वनराज |
अरण्याची शोभा | वनश्री |
अनेक ठिकाणी लक्ष ठेवणारा | अष्टावधानी |
आग विझवनारे यंत्र | अग्निशामक यंत्र |
आपल्या लहरी प्रमाणे वागणारा | स्वच्छंदी |
ईश्वर आहे असे मानणारा | आस्तिक |
ईश्वर नाही असे मानणारा | नास्तिक |
इनाम म्हणून मिळालेली जमीन | वतन |
उंचावरून कोसळणारा किंवा पडणारा पाण्याचा प्रवाह | धबधबा |
ऐकायला न येणारा | बहिरा |
बोलायला न येणारा | मुका |
भाषण करणारा | वक्ता |
भाषण ऐकणारा | श्रोता |
कथा सांगणारा | कथेकरी |
कथा ऐकणारा | श्रोता |
कथा लिहिणारा | कथाकार |
लेख लिहिणारा | लेखक |
कविता लिहिणारा | कवी |
अंग राखून काम करणारा | अंग चोर |
कल्पना नसताना आलेले संकट | घाला |
कधीही जिंकला न जाणारा | अजिंक्य |
कर्तव्याकडे पाठ फिरवणारा | कर्तव्य परमुख |
आपले कर्तव्य तात्काळ पार पाडणारा | कर्तव्यदक्ष |
कष्ट करून जगणारा | कष्टकरी किंवा श्रमजीवी |
कसलीच इच्छा नसणारा | निरिच्छ |
गाणे गाणारा | गायक |
कविता रचणारी | कवयित्री |
कमी आयुष्य असणारा | अल्पायुषी |
भरपूर कष्ट आयुष्य असलेला | दीर्घायुषी |
कमी वेळ टिकणारा | अल्पजीवी, क्षणभंगुर |
कादंबऱ्या लिहिणारा किंवा लिहिणारी व्यक्ती | कादंबरीकार |
किल्ल्याच्या सभोवताली असणारी भिंत | तट किंवा तटबंदी |
कुस्ती खेळण्याची जागा किंवा मैदान | आखाडा किंवा हौद |
दुसऱ्याने केलेले उपकार जाणणारा | कृतज्ञ |
दुसऱ्याने केलेले उपकार विसरणारा | कृतघ्न |
कैदी किंवा बंदी ठेवण्याची जागा | कारागृह किंवा बंदीशाळा किंवा बंदीगृह |
शिक्षा झालेला आरोपी | बंदिवान |
खूप दानधर्म करणारा व्यक्ती | दानशूर किंवा दानवीर |
खूप मोठा विस्तार असलेले शेत किंवा मैदान | विस्तीर्ण किंवा ऐसपैस |
खूप पाऊस पडणे | अतिवृष्टी |
गाई गुरांसाठी बांधलेले घर | गोठा |
घोड्यांसाठी बांधलेले घर किंवा घोडे बांधायची जागा | तबेला |
घरदार किंवा संसार नष्ट झाला | निर्वासित |
Part two Shabd Samuhabaddal Ek Shabd
चरित्र लिहिणारा व्यक्ती | चरित्रकार |
चार रस्ते एकत्र येतात ती जागा | चौक किंवा चव्हाटा |
तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण किंवा जागा | तिठा |
अनेक लोक एकत्र येतात | गर्दी |
चांदण्या रात्रीचे पंधरा दिवस किंवा पंधरवाडा | शुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष |
चित्रे काढणारा व्यक्ती | चित्रकार |
जमिनीखाली राहणारे विविध प्राणी | भूचर |
समुद्रात किंवा पाण्यात राहणारे विविध प्राणी | जलचर |
पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी | उभयचर |
जमिनी खाली असलेला गुप्त मार्ग किंवा रस्ता | भुयार |
जमिनीचे दान करणे | भूदान |
अचानक पणे जमीन हलायला लागणे | भूकंप |
जादूचे खेळ दाखवणारा व्यक्ती | जादूगार |
ज्याला आई-वडील नाहीत असा मुलगा किंवा मुलगी | अनाथ/पोरका/पोरकी |
ज्याच्या हातात चक्र आहे असा व्यक्ती | चक्रधर/चक्रपाणि |
ज्याला मरण नाही असा व्यक्ती | अमर |
ज्याला शत्रू नाही असा व्यक्ती | अजात शत्रू |
ज्याला लाज नाही असा व्यक्ती | निर्लज्ज |
ज्याची खोली मोजता येत नाही किंवा ज्याला तळ नाही असा | अथांग |
दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमान पत्र | दैनिक |
ठराविक दिवसाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे पत्र | नियतकालिक |
सात दिवस किंवा आठवड्याने प्रसिद्ध होणारे पत्र | साप्ताहिक |
एक महिना किंवा तीस दिवसाने प्रसिद्ध होणारे पत्र | मासिक |
दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे पत्र | त्रैमासिक |
दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे पत्र | षण्मासिक |
दर वर्षाला किंवा वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे चित्र | वार्षिक |
ढगांनी भरलेले आभाळ | ढगाळलेले |
थोड्या वर संतुष्ट असणारा व्यक्ती | अल्पसंतुष्ट |
दररोजचा ठरलेला कार्यक्रम किंवा नित्यक्रम | दिनक्रम |
दारावर दारावर उभा असलेला व्यक्ती किंवा पहारेकरी | द्वारपाल किंवा दारवान |
दुष्काळात सापडलेले लोक | दुष्काळग्रस्त |
दुसऱ्यावर अवलंबून असलेला व्यक्ती | परावलंबी |
दुसऱ्यावर अवलंबून असलेला व्यक्ती किंवा माणूस | स्वावलंबी |
दोन नद्या एकत्र येतात ते ठिकाण | संगम |
देशाची सेवा करणारा व्यक्ती | देशसेवक |
लोकांची सेवा करणारा व्यक्ती | लोकसेवक |
लोकांचे प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती | लोकप्रतिनिधी |
समाजाची सेवा करणारा व्यक्ती | समाजसेवक |
देवापुढे सतत जळणारा दिवा | नंदादीप |
दुसऱ्यावर उपकार करणारा व्यक्ती | परोपकारी |
Part threeShabd Samuhabaddal Ek Shabd
धान्य ठेवण्याची किंवा साठवण्याची जागा | कोठार |
नदीची सुरुवात होते ते ठिकाण | उगम |
नदी समुद्राला जाऊन मिळते ते ठिकाण | नदीचे मुख |
नदीच्या खोलगट भागात साचलेल्या पाण्याची खोल जागा | डोह |
नाटक लिहिणारा व्यक्ती | नाटककार |
नाटकात वा चित्रपटात काम किंवा भूमिका करणारा व्यक्ती | नट,नटी किंवा अभिनेता,अभिनेत्री |
नाव किंवा गाडी चालवणारा | नावाडी किंवा नाखवा किंवा नाविक |
नेहमी घरात बसून राहणार व्यक्ती | घरकोंबडा |
पहाटे पूर्वीची वेळ | उषा:काल |
मुळीच पाऊस न पडणे | अनावृष्टि किंवा अवरशन |
पायापासून डोक्यापर्यंतचा भाग | आपाद मस्तक |
पायात जोडे नसलेला व्यक्ती | अनवाणी |
पाहण्यासाठी आलेले लोक | प्रेक्षक |
पायी जाणारा व्यक्ती | पादचारी |
पाण्याच्या खालून जाणारी बोट | पाणबुडी |
पुराच्या पाण्यामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे असे लोक | पुरग्रस्त |
पूर्वी कधी घडला नाही असा प्रसंग | अभूतपूर्व |
प्रेरणा देणारा व्यक्ती | प्रेरक |
फुकट भोजन व जेवण मिळण्याचे ठिकाण | सदावर्त किंवा अन्नछत्र |
राज्यातील लोक किंवा माणसे | प्रजाजन,रयत किंवा प्रजा |
विकत जेवण मिळण्याचे ठिकाण | खानावळ |
फुकट वा विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण | पाणपोई |
बसगाड्या थांबण्याचे ठिकाण | बसस्थानक |
विमाने थांबण्याचे ठिकाण | विमानतळ |
आगगाडी थांबण्याचे ठिकाण | रेल्वेस्टेशन |
बातमी आणून देणारा व्यक्ती | बातमीदार |
बातम्या वाचणारा व्यक्ती | वृत्त निवेदक किंवा वृत्त निवेदिका |
मन किंवा चित्त आकर्षित करणारा | मनोहर,मनोवेधक,चित्तवेधक किंवा चित्ताकर्षक |
मालाचा साठा करून ठेवण्याची जागा | कोठार,गोदाम किंवा वखार |
माकडाचा खेळ करून दाखवणारा व्यक्ती | मदारी |
मासे पकडणारा व्यक्ती | कोळी |
मूर्ती बनवणारा व्यक्ती | मूर्तिकार |
मूर्तीची पूजा करणारा व्यक्ती | मूर्तिपूजक |
मूर्तीची मोडतोड करणारा व्यक्ती | मूर्तीभंजक |
मंदिरात पूजा करणारा व्यक्ती | पुजारी |
मोजता येत नाही असे | अगनिक |
महान असा ऋषी | महर्षी |
मृत्यू वर विजय मिळवणारा व्यक्ती | मृत्युंजय |
योजना आखणारा व्यक्ती | योजक |
रनांगणावर आलेले मरण | वीरमरण |
रक्षण करणारा व्यक्ती | रक्षक |
रात्रीचा पहारा देणारा व्यक्ती | जागल्या |
मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Shabd Samuhabaddal Ek Shabd
रोग्याचा उपचार करणारा व्यक्ती | डॉक्टर |
रोग्याचा सेवा सुश्रुषा करणारी व्यक्ती | परिचारिका |
लग्नासाठी जमलेली माणसे | वऱ्हाडी |
लढण्याची विद्या किंवा शिक्षण | युद्धकला |
लाखो रुपयांचा मालक | लक्षाधीश |
कोटी रुपयांचा मालक | कोट्याधीश |
लिहिता वाचता येणारा व्यक्ती | साक्षर |
लिहिता वाचता न येणारा व्यक्ती | निरक्षर |
लोकांचा आवडता व्यक्ती | लोकप्रिय |
लोकांनी मान्यता दिलेला व्यक्ती | लोकमान्य |
लोकांचे नेतृत्व करणारा व्यक्ती | लोकनायक |
वनात किंवा जंगलात राहणारे प्राणी | वनचर |
वनात किंवा जंगलात राहणारे माणसे | वनवासी |
डोंगराच्या कपारीत राहणारे लोक | गिरीजन |
वाड वडीलाकडून मिळालेली संपत्ती | वडिलोपार्जित |
विमान चालवणारी व्यक्ती | वैमानिक |
वाहन चालवणारी व्यक्ती | चालक |
व्याख्यान देणारा व्यक्ती | व्यक्ती |
शत्रूच्या गोटातील बातमी काढणारा व्यक्ती | हेर |
शत्रूला सामील झालेला व्यक्ती | फितूर |
शिकारी साठी उंचावर बांधलेला मळा | मचान |
शेती करणारा व्यक्ती | शेतकरी |
शोध लावणारा व्यक्ती | संशोधक |
सर्व इच्छा पूर्ण करणारे झाड | कल्पवृक्ष |
सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय | कामधेनु |
संकट दूर करणारा | विघ्नहर्ता किंवा संकट मोचक |
सांगितले तेवढेच काम करणारा | सांगकाम्या |
सिनेमाच्या कथा लिहिणारा | पटकथाकार किंवा लेखक |
कायम सुखाच्या मागे लागणारा | सुखलोलुप |
स्वतः संपादन केलेली | स्वसंपादित |
स्वतः काम न करता खाणारा | ऐतखाऊ |
स्वतः च्याच फायद्याचा विचार करणारा | स्वार्थी |
स्वतः बद्दल अभिमान असलेला | स्वाभिमानी |
स्वतः बद्दल अभिमान नसलेला | स्वाभिमानशून्य |
दुसऱ्याला सहज काहीही देणारा | उदार किंवा दिलदार |
स्वदेशीचा अभिमान असलेला | स्वदेशभिमानी |
दुसऱ्याची सतत स्तुती करनारा | भाट |
हत्तीला काबूत ठेवणारा व्यक्ती | माहूत |
हरिनासारखी डोळे असणारी स्री | मृगनयना,मृगाक्षी,हरिनाक्षी,कुरंग नयना. |
हिंडून करायचा पहारा किंवा राखण | गस्त |
हिमालयापासून कन्या कुमारी पर्यंत | आसेतू हिमालय |
पंचवीस वर्षांनी साजरा केलेला महोत्सव | रौप्य महोत्सव |
पन्नास वर्षांनी साजरा केलेला महोत्सव | सुवर्ण महोत्सव |
दगडाचे काम करणारा व्यक्ती | पाथरवट |
सतत काम करणारा व्यक्ती | दीर्घोद्योगी |